[[{“value”:”
पुणे – फुफ्फुसाचा कर्करोग असलेले ७० वर्षीय रुग्ण आणि प्रोस्टेट कर्करोगाने पीडित ६२ वर्षीय रुग्णावर एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी उपचार करण्यात टीजीएच- ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमधील डाॅक्टरांच्या टीमला यश आले.
कॅन्सरच्या अचूक उपचारासाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजेंन्सवर आधारीत सिंक्रोनी ऑटोमॅटिक, रिअल-टाइम मोशन सिंक्रोनाइझेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी उपचार करण्यात आला आहे, अशी माहिती टोमोथेरपी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग सल्लागार डॉ. अभिषेक पुरकायस्थ यांनी दिली. यावेळी एमडी रेडीएशन डाॅ. ज्योती मेहता, कार्यकारी संचालक सचिन देशमुख, डाॅ. संतोष साहू, डॉ. गौरव जसवाल उपस्थित होते.
७० वर्षीय रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. अनेक उपचार घेतले मात्र त्रास कमी झाला नाही. ऑन्को लाइफ कॅन्सरमध्ये आल्यावर त्यांचे सीटी स्कॅन आणि पेट स्कॅन केल्यावर त्यांच्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसात कर्करोगजन्य गाठ आढळून आली. बायोप्सीने फुफ्फुसाच्या कार्सिनोमाच्या निदान झाले.
याबाबत डॉ. अभिषेक पुरकायस्थ म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सिंक्रोनी ऑटोमॅटिक, रीअल-टाइम मोशन सिंक्रोनाइझेशन तंत्रज्ञान असलेली आधुनिक प्रणाली उपचारांसाठी एक अचूक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. फुफ्फुस, यकृत, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि प्रोस्टेट कर्करोग यासारख्या विविध कर्करोगावर या माध्यमातून यशस्वी उपचार करणे शक्य आहे. या प्रणालीमुळे ट्यूमरचे स्थान रिअल-टाइममध्ये ट्रॅक करता येते. ज्यामुळे आसपासच्या निरोगी पेशींचे नुकसान कमी प्रमाणात होते. तसेच वेदनाही कमी होते.’
तर दुसऱ्या प्रकरणात सोलापूर येथील ६२ वर्षीय रूग्णाला मूत्रमार्गासंबंधीत समस्या होत्या. तपासणी केल्यावर प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले. त्यामध्ये ईमेज-गायडेड रेडिएशन थेरेपी (आयजीआरटी) हे एक अत्याधुनिक तंत्र आहे जे प्रोस्टेटची हालचाल नियंत्रित करते, जी किरणोत्सर्गासह श्वासोच्छ्वास किंवा आतड्यांच्या हालचालींसारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे बदलू शकते. संपूर्ण उपचार सत्रात आसपासच्या निरोगी ऊतींचे नुकसान होणार नाही याची खबरदारी बाळगण्यात आली. रुग्णावर उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत, असे डाॅ. पुरकायस्थ यांनी सांगितले.
The post Pune: फुफ्फुस, प्रोस्टेट कर्करोग रुग्णांवर यशस्वी उपचार appeared first on Dainik Prabhat.
“}]]