Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pune : ऑनलाइन तिकिटामुळे पर्यटक खोळंबले; शनिवारवाडा पाहण्यासाठी गुगल फाॅर्म भरताना अडथळ्यांची शर्यत

by
November 28, 2024
in आयुर्वेद
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

संदीप घोडके

पुणे – शहरात अनेक एतिहासिक स्थळे असून, ती स्थळे पाहण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक गर्दी करत असतात. त्यातील शहराच्या मध्यभागी असलेला शनिवारवाडा हा पर्यटकांचे खास आकर्षण स्थळ आहे. पुण्यात आलेले बहुतांश पर्यटक शनवारवाडा पाहिल्याशिवाय जात नाहीत. मात्र, हाच शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांना आता दिव्य पार करावे लागत असल्याचे चित्र आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने पर्यटकांना तिकीट ठेवले असून, ते आता ऑनलाइन घ्यावे लागत आहे. मात्र, त्यासाठी अनेकांना तासनतास मोबाइलशी खेळावे लागत असल्याने अनेक पर्यटकांना शनिवारवाडा न पाहताच परतावे लागत आहे. शनिवारवाडा पाहण्यासाठी पूर्वी रोख स्वरुपात तिकीट मिळत होते. त्यात काही महिन्यांपूर्वी बदल करून क्युआर कोड स्कॅन करण्याची पद्धत सुरू झाली.

मात्र, क्युआर कोड स्कॅन केल्यावर गुगल फाॅर्मवर सविस्तर माहिती भरून जीमेल अकाउंट, तसेच फोन नंबर देऊन तिकिटे डाउनलोड करावी लागत आहे. त्यातच अनेकांचा वेळ खर्ची पडत आहे. याशिवाय अनेकांना हे जमतही नाही. पुन्हा पुन्हा माहिती भरण्याच्या त्रासाने पर्यटक नाराज होत आहेत. त्यातच माहिती देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही नाही. येथील सुरक्षारक्षकांवर ही जबाबदारी सोपवून पुरातत्व विभागाने आपली जबाबदारी पार झटकल्याचे चित्र आहे.

शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी सुट्टीच्या दिवसांत, तसेच शनिवारी, रविवारी पर्यटकांची तोबा गर्दी असते. मात्र, या ऑनलाइन व्यवस्थेच्या जाचाने अनेकजण कंटाळून मागे फिरत आहे. त्यामुळे ऑनलाइनसह रोख स्वरूपातही तिकिटांची व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यटक करत आहेत.

“आम्ही मुलाकडे काही दिवसांसाठी आलो आहोत. शनिवारवाडा पाहण्यासाठी आलो असता, ऑनलाइन तिकिटासाठी पाऊण तास प्रयत्न करूनही तिकीट काढता आले नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने रोखीने तिकीट देण्याची सुविधा द्यावी.” – भरत श्रीवास्तव, पर्यटक.

Join our WhatsApp Channel

The post Pune : ऑनलाइन तिकिटामुळे पर्यटक खोळंबले; शनिवारवाडा पाहण्यासाठी गुगल फाॅर्म भरताना अडथळ्यांची शर्यत appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar