Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Protein supplements : ‘प्रोटीन सप्लिमेंट’ची क्रेझ वाढली; तरुणांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह 

by
April 8, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Protein supplements : ‘प्रोटीन सप्लिमेंट’ची क्रेझ वाढली; तरुणांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह 
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Protein supplements : शहरात फिटनेसबाबत जागरूकता वाढत असताना पिंपरी-चिंचवडमधील तरुणांमध्ये ‘प्रोटीन सप्लिमेंट’ घेण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. आकर्षक आणि कसदार शरीरयष्टी मिळवण्यासाठी अनेक युवक जिमकडे वळत आहेत.

त्यासोबतच प्रोटीन पावडर आणि इतर सप्लिमेंट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, या अतिरेकामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्यायामानंतर स्नायूंची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. त्यामुळे काही प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले प्रोटीन सप्लिमेंट शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते. व्हेज, सोया आणि प्लांट-बेस्ड प्रोटीनमुळे शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड मिळतात, ऊर्जा वाढते आणि स्नायूंची वाढ होण्यास मदत होते.

मात्र, योग्य प्रमाण आणि वेळ पाळली नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, प्रोटीन सप्लिमेंटचा अतिरेक केल्यास किडनीवर ताण येणे, पचनाचे विकार, त्वचेवर पुरळ येणे, हार्मोनल असंतुलन, गॅस आणि आम्लपित्त यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः १६ ते २३ वयोगटातील युवकांनी सुरुवातीच्या टप्प्यात प्रोटीन पावडर घेणे टाळावे आणि नैसर्गिक आहारावर भर द्यावा, असा सल्ला दिला जात आहे.

दूध, डाळी, अंडी, सुकामेवा, सोयाबीन आणि कडधान्ये यांसारख्या घरगुती आहारातून प्रोटीन सहज मिळू शकते. मात्र, ‘शॉर्टकट’ म्हणून प्रोटीन पावडरचा वापर वाढताना दिसत आहे. अनेक जिम प्रशिक्षक, दुकानदार किंवा विक्री प्रतिनिधी यांच्याकडूनही सप्लिमेंट्सची आक्रमक शिफारस केली जात असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, नियमित आणि तीव्र व्यायाम करणाऱ्यांसाठी, तसेच व्यावसायिक पातळीवर शरीरसौष्ठव साधणाऱ्यांसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रोटीन सप्लिमेंट उपयुक्त ठरू शकते. परंतु, ज्यांना संतुलित आहारातून आवश्यक पोषण मिळते आणि नियमित व्यायामाची सवय नाही, अशांनी अशा सप्लिमेंट्सपासून दूर राहणेच योग्य ठरते.

संतुलन राखण्याचे आवाहन
योग्य व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे या मूलभूत गोष्टी पाळल्यास आरोग्य चांगले राखता येते. त्यामुळे केवळ आकर्षक शरीरयष्टीच्या नादात प्रोटीन सप्लिमेंटचा अतिरेक न करता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

Baramati Byelection 2026 : “जनभावनेचा आदर करा, उमेदवार मागे घ्या!”, देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसला आवाहन

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar