उन्हाळ्यात केसांसाठी गरम पाण्याचा वापर केल्याने केसात कोंडा (डॅन्ड्रफ) होऊन केस गळण्याची समस्या सुरू होते. सूर्याच्या प्रकाशात अल्ट्रा वायलेट किरणं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे उष्णता आणि धुळीमुळे केसांना नुकसान होतं.
केस अधिक डिहायड्रेट किंवा रखरखीत झाल्यास केसांना दररोज काही वेळ नारळ्याच्या किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. तेलाने केलेला मसाज केसांसाठी सर्वोत्तम मानला जातो. यादरम्यान धूळ किंवा उन्हात जाण्याचे टाळा. उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी न घेतल्यास केस रुक्ष होतात. केसांचा रुक्षपणा कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करु नका. त्याऐवजी थंड पाणी वापरा. केसांना फाटे फुटले असल्यास केस काही काळानंतर ट्रीम करत राहा. केस गळणे आणि केसांत सतत कोंडा होत असल्यास गरम पाण्याचा वापर करू नका. केस धुण्याआधी केसांना हलका मसाज करणे अत्यावश्यक आहे.
मोठ्या प्रमाणात केस गळत असल्यास हेल्दी डाएट करणे गरजेचं आहे. खाण्यामध्ये हिरव्या भाज्यांचा वापर करा. केस धुण्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पुचा वापर करू नका. त्याजागी आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर करा. केस चांगले स्वच्छ राहिले, तर केस गळण्याचे प्रमाण बरेच कमी होते. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास केसांची मुळे मजबूत होतात.