कुबडेपणा म्हणजे पाठीला असलेला बाक, किंवा बाहेर आलेला उभार. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात पाठीचा वरचा भाग जो शरीराच्या बाहेर येऊन त्याला बाक येतो. काहीवेळा डोके आणि खांदेसुद्धा बाहेर निघून येतात. आणि छातीचा पुढचा भाग आत दबलेला असतो. आणि पाठीच्या मणक्यांनी आपला इंग्रजी “एस’प्रमाणे असलेला मूळ आकार सोडून “सी’ अक्षराप्रमाणे आकार धारण केलेला असतो. ज्यामुळे शरीराचा पुढचा भाग झुकून जातो. तसे बघता ही म्हातारपणाची निशाणी आहे.
पण आजकाल कुबडेपणा हा युवकांमध्ये तसेच पौगंडावस्थेमध्येसुद्धा दिसून येतो. जास्त करून नऊ ते अठरा वर्षांच्या मुलांमध्ये हे कुबडेपण बऱ्यापैकी आढळते. यासाठी शारीरिक श्रमरहित जीवन शैली किंवा छोट्या डिजिटल स्क्रिनच्या समोर जास्त वेळ चुकीच्या पद्धतीने बसणे या गोष्टींना जबाबदार ठरवलं जातं.
मुलं जेव्हा मोठी होत असतात त्याचवेळी ही बसण्याची चुकीच्या पद्धतीची सुरुवात त्यांच्यात होते आणि मुळात हीच गोष्ट त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असते, जी मुळात हळूहळू वाढत जाऊन मोठी होते आणि त्याचवेळेस चुकीच्या पद्धतीने बसण्याची सुरुवात होते. त्यामुळेच पाठ आणि खांद्यांमध्ये कुबडेपणा येण्याची तीच खऱ्या अर्थाने सुरुवात असते.
कारणे आणि चिंता :
कुबडेपणाचे मुख्य कारण म्हणजे वर्षानुवर्षे पुढच्या बाजूला झुकून बसल्यामुळे पोटाच्या मांसपेशी कमकुवत होणे हे आहे. यामुळे डिस्क, कंबरेच्या हाडांच्या मध्ये असलेल्या गादीसारख्या पॅडवर असमान दबाव पडणे, आणि या कारणांमुळे ती हाडे आपापसात दाबल्या गेल्यामुळे ही हाडे दुखण्याचं कारण आहे. ऑस्टियोपोरोसिसने पीडित असलेल्या लोकांमध्येही वयोमानानुसार कुबडेपणा विकसित होत जातो. पण सर्वसाधारणपणे बऱ्याच व्यक्तींना या विषयाची साधी जाणीवही असत नाही.
याचा योग्य तो इलाज जर नाही केला तर ही स्थिती संपूर्णपणे विकसित होऊन हाइपरकिफोसिस कुबडेपणामध्ये बदलून जाते आणि याबरोबरच अजून बऱ्याच प्रकारच्या समस्यासुद्धा निर्माण होत जातात. कुबडेपणामुळे शरीरातील फासळ्यांचा ढाचासुद्धा खिळखिळा व्हायला लागतो. याच्या परिणामामुळे हाइपरकिफोसिसने पिडीत असलेल्या बऱ्याच लोकांमध्ये श्वासोच्छवासात त्रास होणे किंवा यासंबंधात असलेल्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
यांच्या चरम स्थितीमध्ये आणि खास करून ऑस्टियोपोरोसिसने पीडित महिलांमध्ये फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण किंवा धोका अधिक वाढतो. कुबडेपणा जेवढा जास्त असेल तेवढाच धोकासुद्धा जास्त वाढलेला असतो. यामुळे नैराश्य आणि चिंतासुद्धा वाढीस लागते. तरीसुद्धा कार्डियाव्हॅस्क्युलर या फुफ्फुसासंबंधीचे आजार किंवा टाइप 2 डायबिटीसची समस्या पण निर्माण होऊ शकते.
कुबडेपणाचे टप्पे :
डाउजर फुगवट्यासोबत कुबडेपणा कित्येक टप्प्यात विकसीत होत जातो, जितक्या लवकर तुम्ही हा डाऊजर फुगवटा (कुबडेपणा) लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रयत्न कराल तेवढा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. हाइपरकिफोसिसच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोके पुढे निघणे हा प्रकार विकसित होतो, ज्यामध्ये आपल्या शरीरातील गुरुत्व केंद्र साधणारी जी रेषा असते, त्या रेषेच्या पुढच्या भागाकडे डोके झुकायला लागते.
डोक्याचा भाग बाहेर निघाल्यामुळे डोक्याखालील खांद्याचा भागही त्या सारखाच बाहेर येण्यास सुरुवात होते. अशा स्थितीत पाठीचा कुबडेपणा सहज सुधारला जाऊ शकतो. किंवा संपूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. पण जेव्हा ही स्थिती पूर्णपणे डाउजर हंपच्या कुबडेपणापर्यंत जर का पोहोचली तर मात्र अशा प्रकारचे कुबडेपणा सरळ करणे फार कठीण होऊन बसते.
अशा स्थितीत चांगल्या परिणामासाठी तुम्हाला कुणीतरी प्रोफेशनल फिजियोथेरापिस्ट किंवा योग थेरापिस्टची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपचार आणि चिकित्सा :
लहान मुले आणि युवकांसाठी, खास करून जेव्हा ते कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात, तेव्हा त्यांना बरोबर पद्धतीने बसण्याची माहिती असणे गरजेचे आहे. पालकांनीही ही जबाबदारी घेऊन त्यांना शिकवायला हवे, की आपल्या दोनी बाहूंना आराम स्थितीमध्ये आणि शरीराला लागून ठेवायला हवे. आणि टायपिंग करतेवेळी आपल्या हातांना डेस्कवर ठेवायला हवे. त्याचबरोबर ही पण गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला हवी की, जेव्हा ते कॉम्प्युटरवर काम करतील तेव्हा आपल्या भुवया कॉम्प्युटरच्या वरच्या भागाच्या स्क्रीनसमोर समांतर रेषेत असायला हव्यात.
आपली बसण्याची खुर्ची पुढील बाजूस झुकलेली असावी. जेणेकरून आपले पाय नितंबासोबत जमिनीला टेकू शकतील. डेस्कटॉप किंवा लॅपटॉप जमिनीला लागून राहील डेस्कटॉप, लॅपटॉप या टॅबलेट जर जास्त दूर ठेवून वापरले की आपली बसण्याची मुद्रा चुकीची बनेल त्यासाठी जे युवक युवती आहेत, त्यांनी या पोर्टेबल गैजेट्सच्या वापरापासून दूर असले पाहिजे.
युवकांनी आणि वयस्कर व्यक्तींनी स्ट्रेचिंगसारखे व्यायाम नियमितपणे केले तर त्यांच्या स्पायनल कॉर्डची लवचिकता वाढण्यासाठी खूप जास्त मदत मिळू शकते. युवकांनी पोटाच्या मांसपेशी मजबूत करण्यावर जोर दिला पाहिजे. कारण यामुळे त्यांची सरळ बसण्याची मुद्रा नेहमीसारखी चांगली होऊ शकते. नियमितपणे योगाभ्यास केला तर तो शरीराच्या दिवसभरातील होणाऱ्या हालचाली विकसित करता करता आपल्यालाही लाभकारक ठरतात.
योगा मनाचे, शरीराचे संतुलनसुद्धा चांगल्या प्रकारे ठेवतो. योगा केल्याने शरीरातील मुख्य मांसपेशी मजबूत होत असतात आणि आपले शरीर कायमस्वरुपी तंदुरूस्त राहू शकते. उभे राहतानाही सरळ उभे राहिले तर आपल्या शरीराचे गुरुत्व केंद्र स्थिर राहते. उभे राहतानाही आपण सरळ उभे राहिले तर आपला आत्मविश्वासही वाढीस लागतो.
तसेच बसतानाही आपल्या खांद्यांना सरळ आणि वर्गाकार ठेवा, डोके वरच्या बाजूला आणि मान, पाठ हे सरळ रेषेत हवे, आपण तसे ठेवण्याची सवय लावून घ्यायला हवी. दोन्ही पाय नेहमी जमिनीवर ठेवा आणि गाडी चालवतानाही आणि रोजची सर्व कामे करताना आपलं आपल्या शरीराकडे लक्ष हवे, ते सरळ आणि योग्य स्थितीत सायला हवे याची काळजी घ्यायला हवी.
स्पायनल कॉर्ड खूप जास्त वाकलेला असेल तर गंभीर कुबडेपणाची स्थिती तयार होते आणि स्पायनल कॉर्डवर किंवा शिरांवर खूप जास्त दबाव पडायला लागला तर यासाठी मात्र एकमात्र पर्याय उरतो तो म्हणजे शस्त्रक्रिया. ऑपरेशन अथवा सर्जरीच्या मदतीने कुबडेपणाच्या या स्थितीला खूपसे कमी करता येऊ शकतं. त्यासाठी सगळ्यात प्रचलित पद्धत म्हणजे स्पायनल फ्युजन होय. यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रभावित मणक्यांना तात्पुरतं आपापसात जोडले जाते.
स्पायनल सर्जरीची समस्या थोडी मोठी असते आणि त्यात, इंफेक्शन, रक्तस्त्राव, दुखण्याचा त्रास, आर्थराइटिस, नसांना इजा होणे आणि डिस्कमध्ये हाडांचे घर्षण होणे, या शक्यता असतात. पहिली सर्जरी जर योग्य ती समस्या दूर करण्यास असमर्थ राहिली तर दुसरीही सर्जरी करावी लागू शकते.
म्हणून शक्यतो मुलं लहान असतानाच त्यांना बसण्याच्या, उठण्याच्या, तसेच उभे राहण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या पाहिजेत, शिकवल्या पाहिजे हे खूप जरुरी आहे. म्हणजे त्यांचे मन आणि शरीर दोन्हीही तंदुरूस्त राहील आणि ते स्वस्थ राहू शकतात.
– डॉ. अरविंद कुलकर्णी