सध्या डाळिंब या फळाला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. कारण आता भारतातच नाही तर विदेशातूनसुद्धा डाळिंबाला मागणी आहे. मात्र विदेशात डाळिंब का निर्यात करत असतील. त्याचं महत्व काय आहे किंवा त्याचे महत्वाचे फायदे काय़ आपल्याला माहित असायला हवेत…
– शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
– घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.
– यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी
– मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.
-डाळिंबाचे दाणे, सेंधे मीठ आणि मीऱ्याची पुड हे एकत्र करुन खाल्यास खोकला किंवा कफाचे आजार दुर होतात.