Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pneumonia: हिवाळ्यात निमोनियाचा धोका वाढतो; लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधक उपाय जाणून घ्या

by
December 25, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Pneumonia: हिवाळ्यात थंडी, धुके आणि वाढलेला संसर्ग यामुळे निमोनियाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असा इशारा आरोग्यतज्ज्ञ देतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. वेळेवर लक्षणे ओळखून योग्य उपचार घेतल्यास निमोनियावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

निमोनिया म्हणजे काय?

निमोनिया हा फुफ्फुसांचा जंतुसंसर्गजन्य आजार आहे. या आजारात फुफ्फुसातील हवा साठवणाऱ्या पिशव्यांमध्ये (अल्व्हिओलाई) कफ, पाणी किंवा पू साचते. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.

निमोनिया कसा होतो?

निमोनिया होण्यामागे विविध कारणे असू शकतात. बॅक्टेरिया हे त्यामागील सर्वात सामान्य कारण आहे. याशिवाय सर्दी किंवा फ्लूनंतर व्हायरसमुळेही निमोनिया होऊ शकतो. काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये फंगस कारणीभूत ठरतो.

मधुमेह, कुपोषण, आजारानंतरची कमजोरी, वाढते वय किंवा लहान वय यामुळे प्रतिकारशक्ती कमी असल्यास निमोनियाचा धोका वाढतो. तसेच थंडी, धूळ, धूर, प्रदूषण आणि सतत ओलसर वातावरण यामुळेही हा आजार बळावू शकतो. साधी सर्दी किंवा खोकला वेळेवर बरा न झाल्यास तो छातीत उतरून निमोनियात रूपांतर होऊ शकतो.

निमोनियाची प्रमुख लक्षणे

निमोनियाची सुरुवात जोराच्या खोकल्याने (कफासह) होऊ शकते. यासोबत ताप, श्वास घेण्यास अडचण, छातीत दुखणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कफाचा रंग पिवळा किंवा हिरवा असू शकतो. वृद्ध व्यक्तींमध्ये गोंधळ, भूक न लागणे यासारखी लक्षणेही दिसू शकतात.

घरगुती उपाय (डॉक्टरांच्या उपचारांसोबत पूरक)

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, निमोनिया हा गंभीर आजार असल्याने वैद्यकीय उपचार आवश्यकच आहेत. मात्र उपचारांसोबत काही घरगुती उपाय पूरक ठरू शकतात.
गरम पाण्याची वाफ दिवसातून दोन वेळा घेतल्यास कफ सैल होतो. आलं, तुळस आणि मिरीचा काढा घेतल्यास सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो. कोमट दुधात हळद घालून रात्री घेतल्यास दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधात ठेचलेला लसूण घेतल्यास जंतुसंसर्गाशी लढण्यास मदत मिळते. तसेच कोमट पाणी जास्त प्रमाणात पिणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

काय टाळावे?

थंड पाणी, फ्रिजमधील पदार्थ, धूम्रपान आणि थंड हवा थेट अंगावर येणे टाळावे. कोणतीही अँटिबायोटिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

डॉक्टरांकडे तात्काळ कधी जावे?

श्वास खूपच अडखळत असेल, ताप तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत असेल, छातीत तीव्र वेदना होत असतील, ओठ निळसर पडत असतील किंवा रुग्ण लहान मूल अथवा वृद्ध असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.

हिवाळ्यात थोडीशी काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास निमोनियासारख्या गंभीर आजारापासून बचाव करणे शक्य आहे.

Join our WhatsApp Channel

The post Pneumonia: हिवाळ्यात निमोनियाचा धोका वाढतो; लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधक उपाय जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar