थंडीच्या दिवसांत त्वचेतील आर्द्रता कमी होते. त्याची ताबडतोब काळजी घेतली नाही तर तिच्यावर सुरुकुत्या पडणे, भेगा पडणे असे विकार व्हायला लागतात. म्हणूनच वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे.
थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करावी. चेहरा किंवा हात धुण्यासाठीही गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करावा. गरम पाण्यामुळे त्वचेतील ( winter skin care tips in marathi ) तेल उडून जात नाही.
चेहरा धुऊन झाल्यावर त्यावर ताबडतोब मॉइश्चर क्रीम लावावं. म्हणजे त्वचा निस्तेज दिसत नाही. त्यामुळे बाथरूममध्ये किंवा वॉशबेसिनवर तुम्ही लावत असलेलं क्रीम आवर्जून ठेवा.
मॉइश्चरची निवड योग्य करा. ऑईल बेस्ड अर्थात तेलाचं प्रमाण असलेल्यां क्रीमची निवड करा. काही क्रीम्समध्ये पाण्याचा वापर अधिक केलेला आढळतो. काही क्रीम्स पेट्रोलियमचा समावेश अधिक असतो. पण त्याचा वापर सांगाल नाही. कारण त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होते.
बोचऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी हातमोजे किंवा पायमोजांचा वापर करा. कारण उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातला सूर्यही धोकादायकच असतो. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उघडया पडलेल्या भागावर क्रीम लावायला विसरू नका.
आजकाल स्पार्टेक्सच्या फरशा लावण्याची फॅशन आहे. अशा फरशांवर फिरताना पायांना भेगा पडण्याची शक्यता असते. शक्य असल्यास स्लिपर्स घालाव्यात. झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुऊन त्याला क्रीम लावावं. पटकन ऍब्झॉर्ब होणारं क्रीम लावा. क्रीम लावल्यावर पायात मोजे घालावेत. म्हणजे पायांना ऊब मिळेल. आणि भेगा भरून निघतील.
थंडीच्या दिवसांत मुळातच आपण पाणी कमी पितो आणि कोकाकोला किंवा चहा, कॉफी अशी पेये पिण्याकडे कल वाढतो. पण ही पेय पिण्यापेक्षा गरम पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास शरीरारील आर्द्रता टिकून राहते.
इतर भागांवरील त्वचेच्या ( winter skin care tips in marathi ) तुलनेत हात, पाय, कोपरं, ढोपरं, घोटे यांच्यावरील त्वचा पटकन कोरडी होते. त्यामुळे रात्री झोपताना या भागांना क्रीम लावून झोपावं. म्हणजे त्या भागांना मॉईश्चर मिळण्यास मदत होईल.
हिवाळ्यात त्वचा नाजूक असते. तुम्हाला जर सोरायसिस, इसप किंवा अन्य काही त्वचारोग झाले असतील तर तुम्ही अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याला धक्का लागेल असे कपडे तसंच केमिकल असलेल्या डिर्टजट पावडरचा वापर टाळावा. सौम्या प्रतीचं क्लिन्झर्स किंवा मॉईश्चराइझरचा वापर करावा.
अंतर्बाह्य त्वचेला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. परंतु वर म्हटल्याप्रमाणे थंडीत मुळातच पाणी कमी जातं. म्हणूनच पाणीदार फळांचं सेवन करा. कलिंगड, टरबुज, सफरचंद, संत्र, किवी आदी फळ तसंच सेलरी, टोमॅटो, काकडी, गाजर अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. थोडक्यात तुम्हाला अधिकाधिक सी जीवनसत्त्व कसं मिळेल याचा विचार करा. त्याचप्रमाणे ओमेगा-3 ज्यातून मिळतं असे जाड, चरबीयुक्त माशांचं सेवन करा.
कित्येकदा क्लिन्झर्सचा वापर केला जातो. मात्र क्लिन्झर्समुळे त्वचा अधिकच कोरडी होते. म्हणूनच क्लिन्झर्स लावल्यावर किमान 30 सेकंदांसाठी तसाच ठेवावा. म्हणजे अधिक कोरडेपणा होईल आणि त्यानंतर त्यावर टोनर आणि नंतर मॉईश्चरायझर लावा. म्हणजे कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.
घरगुती मॉईश्चरचा वापर करा. मध, योगर्ट, ऑलिव्ह ऑइल्सचा वापर करा. बदामाचं तेल, केळी आणि कोरफड याचं एकत्रित मिश्रण करून ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेह-याला लावा. तुम्हाला हव्या त्या गोष्टी एकत्रित करा आणि ते चेह-याला लावा. आणि थोड्या वेळाने चेहरा धुऊन टाका. म्हणजे शरीरातील आर्द्रता टिकून राहायला मदत होईल.
कित्येक जणांना थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याचाही त्रास होतो. केवळ फुटत नाहीत तर कित्येकांच्या ओठांची सालंदेखील निघतात. ते अतिशय खराब दिसतं. ही सालं हळुवारपणे काढायला गेलात तर त्यातून रक्त येण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्याजवळ सतत लिपबाम किंवा अन्य मॉईश्चरायझर क्रीम ठेवावं. ओठ कोरडे होण्याचा त्रास असलेल्यांनी ओठांना नियमित क्रीम लावल्यास ओठ फुटणार नाहीत.