Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Pineapple benefits : आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या अननसाचे हे सात फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

by
February 18, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Pineapple benefits : अननस हे केवळ एक स्वादिष्ट फळ नसून ते पोषक तत्वांचा खजिना आहे. मूळचे दक्षिण अमेरिकेतील असलेले हे फळ आज जगभरात लोकप्रिय आहे. बाहेरून खडबडीत आणि ओबडधोबड दिसणारे हे फळ आतून रसरशीत आणि अत्यंत गुणकारी असते.

अननस हे नाव ब्राझीलमधून आले असून, त्याचा आकार पाइन वृक्षाच्या शंकूसारखा (Pine Cone) असल्याने त्याला इंग्रजीत ‘पाइनॅपल’ (Pineapple )असे म्हणतात. भारतात १५४८ साली अननसाची लागवड सुरू झाली. आज आसाम, बिहार, केरळ आणि प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान याला फुले येतात आणि जुलै ते सप्टेंबर या काळात फळे पिकतात.

अननसाचे आरोग्यवर्धक फायदे Pineapple benefits

१. हाडांची मजबुती आणि दातांचे आरोग्य

अननसात मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते. हाडांच्या विकासात आणि मजबुतीमध्ये मॅंगनीज महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय, दररोज एक ग्लास अननसाचा रस प्यायल्याने दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.

२. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवते

अननसात व्हिटॅमिन सी आणि ब्रोमेलेन नावाचे घटक असतात. यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते.

३. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त 

अननसात फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यातील पोषक घटकांमुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान होते.

४. पचनसंस्थेसाठी उत्तम

अननस हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. यातील ‘ब्रोमेलेन’ हे घटक पोटातील ऍसिडवर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य जपले जाते आणि ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.

५. हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण

या फळामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ‘ब्रोमेलेन’मुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्याची शक्यता कमी होते, परिणामी हृदयविकाराचा धोका टळतो.

६. कॅन्सरपासून बचाव

अनेक संशोधनांनुसार, अननसाचे नियमित सेवन कॅन्सरचा धोका कमी करू शकते. यातील ब्रोमेलेन घटक विशेषतः ‘कोलोरेक्टल कॅन्सर’ (आतड्याचा कॅन्सर) पासून संरक्षण मिळवून देण्यास मदत करतात.

७. सौंदर्यवर्धक गुणधर्म

अननसाला ‘बिटा केरोटीनचे पॉवर हाऊस’ म्हटले जाते. यामुळे त्वचा, केस आणि नखे यांना नैसर्गिक झळाळी प्राप्त होते आणि शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो.

अननसाचा वापर कसा करावा?

ताजे फळ: पक्व फळ ताजे खाणे सर्वात उत्तम असते.
ज्यूस आणि सॅलड: अननसाचा रस (ज्यूस) आणि फ्रूट सॅलडमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
इतर पदार्थ: यापासून मुरंबा, कडी, शिर्का आणि आसव देखील तयार केले जाते.

टीप: डायबीटीजचे रुग्ण देखील कमी ग्लाइसेमिक इंडेक्समुळे मर्यादित प्रमाणात अननसाचे सेवन करू शकतात.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar