Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Paracetamol: गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा जास्त वापर टाळावा; नवीन रिसर्चमध्ये गंभीर इशारा

by
August 21, 2025
in लाईफस्टाईल
A A
Paracetamol: गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा जास्त वापर टाळावा; नवीन रिसर्चमध्ये गंभीर इशारा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Paracetamol: गर्भावस्थेत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आईवर होणारा चांगला किंवा वाईट परिणाम थेट बाळाच्या आरोग्यावर होतो. डोकेदुखी, ताप किंवा वेदना यासाठी अनेकदा लोक सहजपणे पॅरासिटामॉल घेतात. पण अलीकडच्या संशोधनात असे दिसून आले आहे की गर्भवती महिलांनी या औषधाचा जास्त वापर करणे धोकादायक ठरू शकते.z

गर्भावस्थेत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आईवर होणारा चांगला किंवा वाईट परिणाम थेट बाळाच्या आरोग्यावर होतो. डोकेदुखी, ताप किंवा वेदना यासाठी अनेकदा लोक सहजपणे पॅरासिटामॉल घेतात. पण अलीकडच्या संशोधनात असे दिसून आले आहे की गर्भवती महिलांनी या औषधाचा जास्त वापर करणे धोकादायक ठरू शकते.

रिसर्चमध्ये काय आढळलं?

हेही वाचा –‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून कोमल भाभी बाहेर? स्वत: केले स्पष्ट

हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात 46 संशोधनांचा आढावा घेण्यात आला. यात 1 लाखांहून अधिक लोकांचा डेटा वापरण्यात आला. त्यात 27 संशोधनांमध्ये पॅरासिटामॉलचा वापर व बाळामध्ये होणारे ऑटिझम (ASD) आणि ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) यांसारख्या न्यूरोलॉजिकल विकारांमध्ये संबंध असल्याचे दिसून आले.

शोधक अँड्रिया ए. बॅकरेली यांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान जास्त प्रमाणात पॅरासिटामॉल घेतल्याने पुढील पिढीत अशा तंत्रिका-विकासाशी निगडित समस्या उद्भवू शकतात.

पॅरासिटामॉलचा धोका

काही संशोधनांनुसार, जर गर्भवती महिला २२ ते २८ दिवस सलग पॅरासिटामॉलचं सेवन केलं तर त्याचा दुष्परिणाम आई आणि बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. या औषधाला तुलनेने सुरक्षित मानलं जात असलं तरी, त्याचा वापर विवेकाने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

गर्भवती महिलांसाठी हेल्थ टिप्स

कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.

ताप, डोकेदुखी, अंगदुखी आल्यास लगेच पॅरासिटामॉल न घेता घरगुती उपाय करून बघा (जसे की कोमट पाण्याची पट्टी, जास्त पाणी पिणं, विश्रांती घेणं).

संतुलित आहार घ्या. हिरव्या भाज्या, फळं, दूध, सुका मेवा यांचा समावेश करा.

पुरेशी झोप व डॉक्टरांच्या सल्ल्याने हलकासा व्यायाम करा.

कुठलीही औषधं घेताना फक्त स्वतःच्या सोयीसाठी नाही तर बाळाच्या आरोग्याचा विचार करूनच निर्णय घ्या.

पॅरासिटामॉल हे सामान्यपणे वापरले जाणारे वेदनाशामक औषध असलं, तरी गर्भवती महिलांनी त्याचा जास्त किंवा अनावश्यक वापर केल्यास बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधांचा वापर करणे योग्य आहे.

एकंदरीत, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल किंवा इतर औषधांचा वापर फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. कारण आईचा आरोग्यदायी निर्णय म्हणजे बाळाचं सुरक्षित भविष्य.

Join our WhatsApp Channel

The post Paracetamol: गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा जास्त वापर टाळावा; नवीन रिसर्चमध्ये गंभीर इशारा appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar