[[{“value”:”
पालक आणि मुलाचे नाते हे खूप खोल नाते आहे. या नात्यामध्ये प्रेम, काळजी आणि विनोद हे सर्व काही असते, परंतु कधीकधी पालक त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आवश्यकतेपेक्षा जास्त हस्तक्षेप करतात. असे केल्याने मुलांवर वाईट परिणाम होतो आणि आपलं मुलं आपल्यापासून दूर होण्याची भीती निर्माण होती.
मुलांचे संगोपन करणे हे अतिशय जबाबदारीचे काम आहे. आपलं मूल सुखी, स्वावलंबी आणि यशस्वी व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. परंतु मुलांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याशी निरोगी संबंध राखणे हे काही सोप्पे काम नाही. मात्र अलीकडे “पांडा पॅरेंटिंग” नावाच्या एका अनोख्या आणि मनोरंजक पालकत्वाच्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पांडा हे नाव ऐकताच तुमच्या मनात एका गोंडस आणि शांत प्राण्याची प्रतिमा निर्माण झाली असेल. खरं तर “पांडा पॅरेंटिंग”ची कल्पनाही यातूनच प्रेरित आहे. मुलांवर अनावश्यक दबाव न आणता प्रेमाने आणि सहजतेने त्यांचे संगोपन करण्यावर या पालकत्वाच्या शैलीत भर दिला जातो. यामध्ये पालक आपल्या मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करतात आणि त्यांना त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी देतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला पांडा पालकत्वाचे फायदे सांगणार आहोत.
“पांडा पॅरेंटिंग” म्हणजे काय?
“पांडा पॅरेंटिंग” ही एक अशी पालकशैली आहे ज्यामध्ये पालक मुलांना स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची आणि जीवनातील अनुभव समजून घेण्याची संधी देतात. यात मुलांवर जबरदस्ती किंवा दबाव आणला जात नाही, तर ते स्वत:च्या समस्यांवर उपाय शोधू शकतात, हे त्यांना समजावून सांगितले जाते. पांडा प्राणी आपल्या मुलांशी अतिशय संयमी वर्तन करतात म्हणून या पालकशैलीचे नाव पांडावरून पडले आहे. पांडा पालकत्वाचा हेतू मुलांना स्वतंत्र आणि जबाबदार बनविणे हा आहे, परंतु त्याच वेळी त्यांना पालकांचे प्रेम आणि आधाराची अनुभूती देणे आहे.
“पांडा पॅरेंटिंग” चे फायदे कोणते?
१) मुले स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकतात आणि स्वावलंबी बनतात.
२) “पांडा पॅरेंटिंग”मुळे मुलांना त्यांच्या भावना आणि विचार महत्त्वाचे आहेत याची जाणीव होते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
३) आई-वडिलांचा पाठिंबा आणि प्रेम मुलांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते.
४) मुलं स्वत:च्या समस्यांवर उपाय शोधायला शिकतात, ज्यामुळे त्यांच्यात जबाबदारी आणि समजूतदारपणा वाढतो.
५) पांडा पालकत्वात मूल आणि पालक यांच्यात घट्ट आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण होते.
“पांडा पॅरेंटिंग”ची मुख्य तत्त्वे कोणती?
१) पालक मुलांना त्यांचे निर्णय स्वत: घेऊ देतात, परंतु आवश्यकतेनुसार त्यांना मार्गदर्शन देखील करतात.
२) मुलांनी चुका केल्या तर त्यांना शिव्या देण्याऐवजी किंवा शिक्षा देण्याऐवजी त्यांना या चुकांमधून काय शिकता येईल हे समजावून सांगितले जाते.
३) पालक मुलांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात.
४) मुलाला त्याच्या छंद आणि आवडीनुसार स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते.
“पांडा पॅरेंटिंग” प्रत्येक मुलासाठी योग्य आहे का?
“पांडा पॅरेंटिंग” प्रत्येक मुलासाठी योग्य असू शकते, परंतु हे आपले मूल कसे वागते यावर देखील अवलंबून असते. जर तुमचं मूल अधिक संवेदनशील असेल तर ही पालकत्वाची शैली त्याला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकते. मूल जिद्दी असेल तर संयम आणि वेळ या पालकत्वाच्या शैलीत द्यावा लागतो.
“पांडा पॅरेंटिंग” कसे स्वीकारावे?
मुलांवर सतत नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी द्या. चुकांना शिव्या देण्यापेक्षा त्या सकारात्मक पद्धतीने कशा सुधारायच्या हे समजावून सांगा आणि शिकवा. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच, त्यांना नवीन अनुभव घेण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांच्या छंदाचा आदर करा. तसेच, एक सहाय्यक आणि मैत्रीपूर्ण वातावरण तयार करा जेणेकरून ते आपल्याशी मोकळेपणाने बोलू शकतील.
‘हेलिकॉप्टर पालकत्व’ देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत
‘हेलिकॉप्टर पालकत्व’ पालक आणि मुलांमध्ये खूप चर्चेचा विषय बनले आहे. ‘पालक जेव्हा मुलांच्या आयुष्यात जास्त रस घेतात, प्रत्येक गोष्ट ही आपल्याला माहित असायला हवी अशा अट्टहासपायी जे पालक मुलांच्या आयुष्याला नियंत्रित करतात त्यालाच ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ असे म्हणतात. यामध्ये पालक मुलांच्या निर्णयांमध्ये, शिक्षणात, समाजिक व्यवहारांमध्ये किंवा अगदी छोट्या गोष्टींमध्येही भरपूर सहभाग असतो.
The post Panda Parenting : “पांडा पॅरेंटिंग” ! मुलांच्या संगोपनाची एक अनोखी पालकत्व शैली appeared first on Dainik Prabhat.
“}]]