पुणे – भारतीय संस्कृतीत प्रत्येक आजाराचे निदान नैसर्गिकरित्या बरे करण्याचे तंत्रज्ञान आहे. जसजसे आपण आधुनिक होत आहोत त्याप्रमाणे रोगांची संख्या वाढत आहे. अशा सर्व रोगांवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दरम्यान, इतर सामान्य वनस्पतींप्रमाणे ‘अडुळसा’ (Adulsa) ही देखील बहुगुणी वनस्पती अनेक आजारांना मात देऊ शकते. खोकला, दमा, श्वसन विकार या विकारांत प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग केला जातो.
अडुळसाचे (Adulsa) बहुगुणी उपयोग –
कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा (Adulsa) या वनस्पतीचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या आयुर्वेदीय वनस्पतीपासून तयार केलेली अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत.
पानांचा रस, मध, सुंठ, मिरी यांचे मिश्रण कफ, खोकला यांवर देतात. तसेच जखम किंवा व्रण यावर अडुळश्याची (Adulsa) पाने बारीक वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते.
जर घरात कोणाला श्वासविकार, खोकला, दमा व ताप असेल तर अश्या व्यक्तीला अडुळश्याच्या (Adulsa) पानांचा रस प्यायला द्यावा. तसेच पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप येत असतो. अश्यावेळी ही बहुगुणी वनस्पती हाताशी असावी.
सुमारे 4 ते 7 फुट उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. अडुळसाची (Adulsa) मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे आयुर्वेदिक औषधांत वापरली जातात.