[[{“value”:”
PAN Card । Aadhar Card : आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्ड जवळपास प्रत्येक कामात वापरले जाते. आधार कार्डमध्ये तुमचे नाव, पत्ता आणि फोन नंबरपासून फिंगरप्रिंटपर्यंतची माहिती असते. अशा परिस्थितीत आधार चुकीच्या हातात पडल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आज काल आपल्या देशात ‘आधार कार्ड आणि पॅन कार्ड’ हे सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक आहे. तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल किंवा महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल. आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. तर, बँक मध्ये इतर काही कामे असतील पॅन कार्ड सर्वात आधी विचारले जाते.
इतर ओळखपत्रासोबतच ‘आधार कार्ड आणि पॅन कार्ड’ हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, दोन्ही कागदपत्रांमध्ये एक गोष्ट साम्य आहे. ती म्हणजे यावर असणार तुमचा फोटो. हे फोटो पाहून बहुतांश लोक नाराज असल्याचं दिसून येतात.
आधार कार्डरवर माझा फोटो चांगला नाही आला? किंवा सरकारी कागदपत्रांवर खूपच खराब फोटो येतात? अशी तक्रार नेहमीच आपल्या कानावर पडते. पण तुम्हाला माहिती आहे का? असं का होत. याच देखील एक कारण आहे.
एखादा माणूस कुठे फोटो काढत असेल किंवा स्टुडिओतही फोटो काढायला गेला, तर त्यापूर्वी लायटिंग ठीक आहे ना हे नक्की चेक केलं जातं, तेव्हाच तो फोटो चांगला येतो. पण या डॉक्युमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर जिथे त्यासाठी फोटो काढला जातो, त्या कार्यालयात किंवा ऑफीसमध्ये पुरेसा प्रकाश नसतो. असाच फोटो काढला जातो.
तसेच, तुमचा फोटो डिजिटल पद्धतीने अपलोड केल्यावर, कार्डवर प्रिंट करताना त्याची क्वॉलिटी अतिशय खराब येते. याच काही कारणांमुळे बहुतांश लोकांचे फोटो हे खराब किंवा पुसट येतात. आणि त्यामुळे आधार कार्ड किंवा पॅन कार्डवर आपले फोटो खराब येतात.
पॅन आणि आधार लिंक कसे करावे? वाचा…
SMS द्वारे लिंक :
तुम्ही दोन्ही कार्ड SMS द्वारे लिंक करू शकता. यासाठी फोनमध्ये कॅपिटल लेटरमध्ये UIDPAN टाईप करा, नंतर स्पेस देऊन आधार क्रमांक आणि पॅन नंबर लिहा. हा संदेश 567678 किंवा 56161 वर पाठवा. यानंतर आयकर विभाग दोन्ही कागदपत्रांना जोडण्याची प्रक्रिया सुरू करेल.
ऑनलाईन पर्याय देखील सोपा :
तुम्ही घरी बसून ऑनलाईन लिंक देखील करू शकता. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये त्यांच्या सेवांच्या यादीमध्ये ‘लिंक आधार’ चा पर्याय देण्यात आला आहे.
त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे वापरकर्त्यांना त्यांचे तपशील जसे की नाव, पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP देखील येईल. ओटीपी भरल्यानंतर तपशील सत्यापित केला जाईल आणि दोन्ही कागदपत्रे जोडली जातील.
पॅन सेवा केंद्रात जाऊन करा लिंक :
जर वापरकर्त्यांना त्यांचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक मॅन्युअली लिंक करायचे असतील तर ते जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊन करू शकतात. पॅन कार्ड आणि आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी, ‘Annexure-I’ नावाचा फॉर्म भरून सबमिट करावा लागेल.
यासह तुम्हाला पॅन आणि आधार कार्डची प्रत सादर करावी लागेल. ऑनलाइन सेवेप्रमाणे ही सुविधा मोफत नाही. दोन कागदपत्राना मेन्युअली जोडण्यासाठी तुम्हाला विहित शुल्क भरावे लागेल.
The post PAN Card । Aadhar Card : म्हणून ‘आधार कार्ड, पॅन कार्डर’वर तुमचा फोटो खराब येतो; पाहा…. appeared first on Dainik Prabhat.
“}]]
