ऑस्टिओ-अर्थ्रायटिस (ओए) यासारख्या ऑर्थोपेडिक कंडिशन्स अनेकांवर दुष्परिणाम करतात आणि जगणे अधिक आव्हानात्मक ठरतात. ऑस्टिओ-अर्थ्रायटिस हा सर्रास आढळणारा सांध्यांचा आजार असून भारतात हा आजार होण्याचे प्रमाण 22% ते 39% आहे. पुण्यात हे प्रमाण 21.7% आहे. हा आजार जवळजवळ 3 मधील एका व्यक्तीला होतो आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार अधिक दिसून येतो.
65 वर्षांवरील 45% महिलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात, तर 65 वर्षांवरील 70% महिलांमध्ये या आजाराच्या रेडिऑलॉजिकल खुणाही दिसून येतात. ऑस्टिओ-अर्थ्रायटिस झालेल्यांपैकी 10 पैकी 8 जणांना हालचाली करण्यात त्रास होतो, तर 25% जणांना दैनंदिन कामे करता येत नाहीत. या आजारामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका होण्याच्या हेतूने रुग्ण वर्षानुवर्षे पेन-किलर घेतात किंवा जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करून घेतात. आता, स्टेम सेल थेरपी या नव्या पद्धतीच्या उपचारामुळे आशाचे किरण निर्माण झाला आहे.
स्टेम सेल्सना बायोलॉजिकल इन्शुरन्स असे समजले जाते. हे स्टेम सेल्स त्वचा, हाड, नसा, रक्त, हृदय, इ. अशा शरीराच्या निरनिराळ्या भागांमध्ये विकसित होण्यासाठी असंख्य शक्यता निर्माण करतात. शरीरात स्टेम सेल्सचा प्रमुख स्रोत बोन मॅरो, ब्लट प्लेटलेट्स, इम्ब्रियॉनिक सेल्स व मासिक पाळीचे रक्त यातून निर्माण होतो. अनेक आजारांवरील उपचारामध्ये क्रांती आणण्याची आणि लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन साधण्याची क्षमता स्टेम सेल थेरपीमध्ये आहे.
स्टेम सेल थेरपी
स्टेम सेल थेरपी किंवा रीजनरेटिव्ह मेडिसिन स्टेम सेल्सच्या मदतीने रोगग्रस्त, निकामी किंवा जखमी पेशींच्या दुरुस्तीला चालना देते. ते ऑर्गन ट्रान्सप्लांटप्रमाणे काम करतात; म्हणजेच, स्टेम सेल थेरपी डोनरऐवजी रुग्णाच्याच पेशींचा वापर करते.
स्टेम सेल्स शरीरातून काढून घेतले जातात आणि सांध्यांच्या पेशी किंवा हृदयाच्या स्नायूंच्या पेशी अशा विशिष्ट प्रकारच्या पेशींसाठी वापरण्यासाठी प्रयोगशाळेत त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेले हे स्पेशलाइज्ड सेल्स बाधित अवयवामध्ये बसवले जातात, जेणे करून दुरुस्ती केली जाईल व जखम नैसर्गिकरित्या भरेल.
भारतातील डॉक्टर्सकडून स्टेम सेल्स थेरपी वापरण्याचे प्रमाण आता वाढले आहे आणि हाडे व सांध्यांचे आजार, मेंदू व नर्व्हस डिसऑर्डर यावरील उपचारासाठीही त्याचा वापर होऊ लागला आहे.
ऑर्थोपेडिक्समधील रीजनरेटिव्ह मेडिसिन
रीजनरेटिव्ह मेडिसिनचे एक स्वरूप असणारी, ऑर्थोपेडिक्समधील स्टेम सेल थेरपी म्हणजे इन्व्हेजिव्ह सर्जरी न करता शरीर बरे करणे. ऑर्थोपेडिक्समध्ये झालेल्या प्रगतीमुळे, पारंपरिक सर्जिकल उपचारांच्या तुलनेत स्टेम सेल्स उपचार वापरण्याचा फायदेही स्पष्ट झाले आहेत. ट्रॉमा, ट्युमर किंवा इन्फेक्शनमुळे हाडांच्या बरे होण्यापासून टेंडन किंवा लिगामेंट तसेच कार्टिलेज दोषांपर्यंत स्टेम सेलमुळे ऑर्थोपेडिक्समध्ये क्रांती घडून येऊ शकते.
स्टेम सेल थेरपीचे फायदे…
नैसर्गिकरित्या व जलद बरे वाटण्यासाठी चालना: मनुष्याचे शरीर स्वतःचे स्वतः बरे होऊ शकते. स्टेम सेल थेरपीमधील नव्या तंत्रांमध्ये या नैसर्गिक क्षमतेचा वापर केला जातो. हाडे किंवा फॅट मॅरोतील स्टेम सेल्सचे रूपांतर शरीरातील अन्य कोणत्याही पेशीमध्ये केले जाऊ शकते. हे सेल्स शरीराच्या एका भागातून काढून घेतले की ते दुखापत झालेल्या अन्य भागात बसवता येतात व नव्या सेल्सच्या वाढींना चालना देता येते.
अतिरिक्त जोखीम टाळता येते : एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्समुळे इम्युन रिजेक्शन गुंतागुंत होण्याची शक्यता असून, रुग्णाच्या मॅरोतून घेतलेले स्टेम सेल्स मात्र हा संभाव्य नकार टाळू शकतात. साजेसे बॉडी मटेरिअल वापरून आणि रुग्णाच्या शरीरात पेशींचे अन्यत्र रोपण करून नकाराची शक्यता कमी केली जाते. शरीरातील पेशींचा वापर केल्याने अजिबात किंवा अत्यल्प धोका असतो.
गुंतागुंत रोखते: अजिबात दुष्परिणाम न होणाऱ्या अतिशय मोजक्या वैद्यकीय उपचारांमध्ये स्टेम सेल थेरपीचा समावेश आहे आणि ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित असल्याचे मानले जाते. बरे होण्याची क्षमता विचारात घेता, स्टेम सेल थेरपीमुळे इन्फेक्शन होत नाही आणि कोणतेही अडथळे येण्याची जोखीम कमी होते. स्टेम सेल थेरपीमुळे व्रण उठण्याची, रिकव्हरीसाठी दीर्घ काळ लागण्याची, रिव्हिजन सर्जरीची व अतिरिक्त उपचारांची शक्यत कमी होते.
महत्त्वाच्या परिस्थितींमध्ये उपचार : डीजनरेटिव्ह डिस्क डिसिज अशा काही परिस्थितींमध्ये काही वेळा अचूक उपचार करणे अवघड ठरते. या कंडिशनमुळे, दुखापत झालेल्या स्पायनल डिस्कमुळे तीव्र वेदना होऊ शकतात. डिस्कला दुखापत झाल्यास त्यामध्ये स्वतःची स्वतः दुरुस्ती होत नाही. कारण, तेथे रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशा वेळी स्टेम सेल थेरपी ही एक नॉन-सर्जिकल उपचार पद्धती ठरू शकते.
नी पॉइंट्स उपचारांतील यश : सांध्यांच्या दुखापती म्हणजे गुडघ्यावरील उपचार. भारतात दरवर्षी 1.2 लाख एकूण नी रिप्लेसमेंट होतात. गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण उच्च असले तरी या शस्त्रक्रिया महागड्या असतात आणि रुग्णाला बरे होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. इंटरव्हेन्शनल ऑर्थोपेडिक्समुळे गेल्या काही वर्षांत विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असणाऱ्या गुडघ्याच्या रुग्णांसाठी अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
– डॉ.व्यंकटेश मोव्वा