लंडन – आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व जाणून माणूस दररोज स्नान करत असला तरी तो वापरत असलेल्या उत्तर अनेक गोष्टींवर जिवाणूंचे साम्राज्य असते असे एका नवीन संशोधनात समोर आले आहे. कोणत्याही घरातील स्वछतागृहातील टॉयलेट सीटपेक्षा जास्त जिवाणू इयर रिंग, अंगठी घड्याळावर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. इयर रिंग, अंगठी घड्याळावर टॉयलेट सीटपेक्षा 400 पट जास्त जिवाणू असतात.
ब्रिटनमध्ये झालेल्या या संशोधनात असे आढळून आले आहे की, लोक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या स्वचतेकडे लक्ष देत नाहीत इयर रिंग, अंगठी, घड्याळ या वस्तू सात दिवस वापरल्या तर त्या वस्तूंवर टॉयलेट सीटपेक्षा 400 पट जास्त जिवाणू जमा होतात. जे दागिने दररोज वापरले जातात त्यावर जमा होणाऱ्या जिवाणूंमुळे विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा या संशोधनात देण्यात आला आहे. दागिन्यांची व्यवस्थित सफाई झाली नाही तर जिवाणूंमुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढते.
सर्वसाधारणपणे माणूस आपल्या चेहऱ्याला एका तासात किमान पाच वेळा स्पर्श करीत असतो अशावेळी तोंड आणि नाकामार्गे जिवाणू शरीरात जाण्याचा धोका वाढतो. नागरिकांनी दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या सफाईकडे लक्ष द्यावे असे आवाहन या संशोधनात करण्यात आले आहे