आयुर्वेदीय दुकानात तालीसपत्राला बर्मी असे म्हणतात. याची लहान लहान पाने किंचित पिवळसर अशी असतात व त्याला एक प्रकारचा अत्यंत मधुर असा सुवास येत असतो. हे तालीसपत्र अनेक रोगात उपयोगी पडते.
अतिसार किंवा वारंवार शौचास जाणे – जर का परसाकडे वारंवार जावे लागत असेल तर मधाबरोबर तालीसादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्यावे. ( talispatra in marathi)
दम्याच्या खोकल्यावर – दमा, खोकला, श्वास आणि पडसे यांच्यावर 15 ग्रॅम तालीसपत्र व दोन चांगली पिकलेली अडुळशाची पाने घेऊन त्यांचा 1/2 लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा व तो गाळून त्यात मध व खडीसाखर घालून खोकला, दमा, सर्दी झालेल्या माणसांनी वरचेवर थोडा थोडा घ्यावा, ज्याने फार बरे वाटते. याने सुटत नसलेला खोकला ताबडतोब सुटतो, छाती मोकळी होते. काढा करण्याऐवजी अडुळशाची पाने घेऊन वाफवून त्याचा रस काढावा. तो रस 20 मि. लि. घेऊन त्यात 1 ग्रॅम वस्त्रगाळ केलेले तालीसपत्राचे चूर्ण घालून 1 ग्रॅम खडीसाखर, 1 ग्रॅम मध व 1 ग्रॅम तूप घालावे व याचे वरचेवर चाटण करावे. ज्याने लगेच बरे वाटते. ( talispatra in marathi)
कफाबरोबर येणारे रक्त थांबते – छातीतून कफाबरोबर येणारे रक्तही तालीसपत्राचे चूर्ण अडुळशाचा रस, तूप, मध, खडीसाखर याबरोबर घेतले असता एका आठवड्यात खात्रीने थांबते.
अन्नपचन, पोटदुखीवर – अन्न पचत नसेल, खाल्ले असता अजीर्ण होऊन पोटात दुखत असेल तेव्हा तालीसपत्र घ्यावे. सुंठ, मिरे, पिंपळी व तालीसपत्र समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करावे व ते चूर्ण अडीच ग्रॅम प्रमाणे दर वेळेस दिवसातून चार वेळा घ्यावे. अजीर्ण कमी होते, पोटात दुखत नाही. खाल्ले तर पोट
फुगते अशावेळी हे चूर्ण उपयुक्त असते.
आमांशावर – आमांश झाल्यावेळीही तालीसपत्राचे चूर्ण फार गुणकारी आहे.
भूक लागत नसल्यास – भूक लागत नसली तर त्रिकूट म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी व तितकेच तालीसपत्राचे चूर्ण घालून वस्त्रगाळ करून एकत्र खलावे. रोज दोनदा सकाळ संध्याकाळ अडीच ग्रॅम घ्यावे. त्याने उत्तम भूक लागते. शक्ती वाढते, आजारपणात हुशारी येते.
वायू पोटात न धरण्यासाठी – वायू पोटात न धरण्यासाठी सुंठ, मिरे, पिंपळी व तितकेच तालीसपत्राचे चूर्ण घालून वस्त्रगाळ करून, एकत्र करून ठेवावे. रोज दोनदा सकाळ संध्याकाळ 2 ग्रॅम घ्यावे घेतात, वायू होत नाही.
अरूचीवर – तालीसपत्राचा उपयोग विशेषतः अन्न पचत नाही, तोंडाला अरूची आली असता होतो. आयुर्वेदीय ग्रंथ चरकसंहितेत तालीसादि चुर्णाची कृती वर्णिली आहे. अरूचीवर ते 2 ग्रॅम तीन वेळा तूप – मधाच्या अनुपानात घेतले असता अरूची जाते. तालीसादि चूर्ण असे बनवितात.
तालिसादि चूर्ण – तालीसपत्र 12 ग्रॅम, वेलदोडा 12 ग्रॅम, दालचिनी 12 ग्रॅम, काळी मिरे 24 ग्रॅम, सुंठ 34 ग्रॅम, पिंपळी 48 ग्रॅम, वंशलोचन 96 ग्रॅम व खडीसाखर 1 किलो घेऊन त्याचे चूर्ण करावे चांगले खलून बरणीत भरून ठेवावे.अनेक रोगांवर ते उपयुक्त आहे. ( talispatra in marathi)
उलटीवर – उलटी होते त्यावेळी तालिसादी चूर्ण द्यावे.
ताप येत असल्यास – तालिसादी चूर्ण मधाबरोबर घेतले असता ताप उतरतो.
पानथरीवर – पानथरी वाढली आहे अशा परिस्थितीत पानथरीवर रामबाण उपाय म्हणजे पूप आणि मधात तालिसादि चूर्ण घ्यावे. त्याचा निश्चितच फायदा होतो. लगेच गुण येतो.
( talispatra in marathi)