Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नियमित दही खाण्याचे एक ना अनेक फायदे

by प्रभात वृत्तसेवा
April 7, 2021
in आहार
A A
नियमित दही खाण्याचे एक ना अनेक फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्याकडे एक जुनी प्रथा आहे. एखाद्या शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या कामाला जाण्यापूर्वी आपल्याला दही साखर खाण्यासाठी देतात. दह्याचा वापर तीर्थ म्हणून केला जातो. कारण दही खाणे शुभ मानलं जातं. दही हे असं पदार्थ आहे जे सगळ्यांच्या घरामध्ये अगदी सहजपणे असतंच. दही आरोग्यासाठी ही पौष्टिक तसेच पचायलाही सोपे असते. अपचन, गॅससारख्या समस्यापासून दही खाल्ल्याने सुटका मिळते.

1. नियमित दही खाल्ल्याने शरीरातील रक्‍ताची कमतरता दुर होते.
2. दह्यामुळे रक्‍तातील साखरेची पातळी योग्य राखली जाते आणि मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत करते.
3. दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. ह्याने वजन कमी होण्यास मदत होते.
4. दह्यामधून व्हिटॅमिन ‘बी-5’, ‘बी-12’ असे जीवनसत्वे मिळतात. जे तुम्हाला रक्तातील हिमोग्लोबीन वाढण्यासाठी मदत करते.

5. दही खाल्ल्याने व्हिटॅमीन ‘डी’ आणि कॅल्शियम मिळते. त्यामुळे दात मजबूत राहतात.
6. दह्यामध्ये व्हिटॅमीन ई, झिंक आणि फॉस्फरस असतात.
7. दह्यामध्ये कॅल्शियम सोबतच प्रोटीनचं प्रमाणही अधिक असतं. दही हे एक चांगलं अँटीऑक्‍सिडेंट आहे.
8. दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्‍समुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते. वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची ताकद शरीराला मिळते.
दही कधी खावे ?
दही शक्‍यतो दिवसा खावे. सकाळी नाश्‍ता किंवा जेवताना खावे. रात्रीच्या वेळी दही खाल्याने शरीरात कफ होण्याची शक्‍यता असते.
डॉ.आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886

Tags: aarogya jagar 2020aarogya newsArogyaArogyaparvhelth tipslife styletopnewsआहारदही
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar