Saturday, June 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ओमेगा-3 पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड

by प्रभात वृत्तसेवा
October 16, 2019
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्या शरीरात ओमेगा-3 नावाचं पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतं. जे आपल्या शरीरासाठी आवश्‍यक असलेल्या पोषणमूल्यांपैकी एक असतं. त्यामुळे शरीराचं कार्य तर सुधारतंच, त्याचबरोबर मेंदू, हृदय व डोळे यांच्या निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.

आपल्याकडे काही जणांना फॅट हा शब्दच नकोसा वाटतो, परंतु काही फॅट चांगले फॅटसुद्धा असतात व ते आपल्या आरोग्याचा अविभाज्य भाग असतात. दिवसभरातल्या आहारातून ते योग्य प्रमाणात आपण ग्रहण करायला हवं याची बहुतेक जणांना जाणीवच नसते. आपलं शरीर फार कार्यक्षम मशीन आहे जे आपल्या आहारामधून भरपूर मेद घेऊन त्याची निर्मिती करतं. तरीही, ओमेगा-3 आणि ओमेगा-3 सारखे मुळातच तयार असलेले आवश्‍यक मेद हे मशीन तयार करू शकत नाही.

त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी आपल्याला बाहय स्त्रोतांवर अवलंबून राहावं लागतं. हे फॅटी ऍसिड (मेदाम्ल) शरीरासाठी आवश्‍यक असतात. कारण त्यांच्या कमतरतेमुळे तणाव, प्रतिकारशक्ती कमी होणे, यकृत व किडनीसारख्या अवयवांचे कार्य निकामी होणे असे गंभीर मानसिक व शारीरिक आजार होऊ शकतात.

ओमेगा 3 :

हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌स असतात जे आपल्या आरोग्यासाठी आवश्‍यक पोषणांपैकी एक असतात. ते आपल्या शरीराचं कार्य सुधारतात आणि प्रौढांच्या व मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ओमेगा-3 फॅटी ऍसिड तीन प्रकारचे असतात. अल्फा-लिनोलेनिक ऍसिड, इकोसॅपेन्टाइनॉइक ऍसिड आणि डोकोसॅहेइक्‍सानॉइक ऍसिड. इकोसॅपेन्टाइनॉइक ऍसिड आणि डोकोसॅहेइक्‍सानॉइक ऍसिड मांसांमध्ये आढळतं तर अल्फा-लिनोलेनिक ऍसिड नट्‌स किंवा बियांमधून प्राप्त होतं.

ओमेगा-3 मेंदू, हृदय व डोळे यांच्या आरोग्यासाठी आवश्‍यक आहे. ओमेगा-3 रक्ताच्या गाठींसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात, असं वैद्यकीय संशोधनातून आढळलं आहे. ते पेशीपटलाची द्रवता राखतात व रक्ताभिसरण व ऑक्‍सिजन पुरवठा वाढवतात. डोकोसॅहेइक्‍सानॉइक ऍसिडरक्तामध्ये प्रसरण होत असलेल्या बॅड फॅट(ट्‍रायग्लिसराइड)ला थांबवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. इकोसॅपेन्टाइनॉइक ऍसिड आणि डोकोसॅहेइक्‍सानॉइक ऍसिड यांना -ह्युमेटॉइड आर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये ताठरपणा व सांधेदुखीचा उपाय म्हणून ओळखले जातात.

ओमेगा-3 हृदयासाठी लाभदायी असून हृदयविकाराचा झटका किंवा आघात येण्याची शक्‍यता कमी करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन निरोगी हृदयासाठी नियमित ओमेगा-3 घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, ओमेगा-3 फॅटी ऍसिड निरोगी लोकांच्या हृदयासाठी आणि ज्यांना कार्डियोव्हॅस्क्‍युलर आजार आहेत किंवा हा आजार होण्याची दाट शक्‍यता आहे, त्यांच्यासाठी लाभदायी आहे. संशोधनामधून असं समोर आलं आहे की ओमेगा-3 युक्त असलेल्या आहारामुळेसुद्धा बालकांची दृष्टी चांगली होते.

ओमेगा-3चे लाभ केवळ शरीरासाठीच नाहीत. त्याच्या पुरेशा प्रमाणाने मानसिक आरोग्यावरसुद्धा सकारात्मक परिणाम होतात. अभ्यासामधून लक्षात आलं आहे की, ओमेगा-3 युक्त आहार घेत असलेल्या लोकांमध्ये तणावाचं प्रमाण फारच कमी असतं.

आवश्‍यक फॅटी ऍसिड्‌स मुलांची वाढ व विकासासाठी तसेच त्यांची बौद्धिक वाढ होण्यासाठीसुद्धा महत्त्वाचे असतात. ओमेगा-3 हा मेंदूच्या आरोग्यासाठीचा क्रांतिकारी घटक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे वाचण्याची व स्मृतीची क्षमता कमी होते. त्याच्या नियमित घेण्यामुळे एकाग्रता कमी होणे अति क्रियाशिलता यांची लक्षणं मुलांमध्ये कमी होतात.

खरं तर, संशोधकांनी असा शोध लावला आहे की, ओमेगाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये वाईट लक्षणं दिसतात. अशा मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा अभ्यासाच्या आणि वागणुकीच्या तक्रारी जास्त असतात. मानवाच्या मेंदूचा एक-चतुर्थाश भाग अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌सने बनला आहे आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे डिमेन्शियाचा धोका वाढतो.

ओमेगा-3 चे काही उत्तम स्त्रोत पुढीलप्रमाणे
– मासे
– माशांपासून बनलेलं तेल
– कॉड लिव्हर ऑइल
– क्रिल ऑइल
शाकाहारी लोक गडद हिरव्या पानांच्या पालेभाज्या, अळशीचं बी (फ्लॅक्‍ससीड्‌स), सोयाबीन, राजमा, मटकी, ब्लॅक बीन्स, अक्रोड व कॅनोला ऑईल (पांढ-या मोहरीचं तेल) यांचा वापर करू शकतात.

भारतामध्ये काही टेबल-स्प्रेड्‌समध्ये (ब्रेडवर लावायचे पदार्थ) भाजीपाल्यांमधून काढलेल्या ओमेगा-3चासुद्धा वापर करतात. तुम्ही त्याला तुमच्या न्याहारीमध्ये विशेषत्वाने या फॅटची आवश्‍यकता असलेल्या तुमच्या मुलाच्या आहारामध्ये त्याचा नियमित वापर करू शकता.

डॉ. शितल जोशी

Tags: aarogya jagar 2019
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar