आपण पेपर, टीव्ही वर अनेक वेळा ऐकतो किंवा वाचतो ओमेगा 3 फॅटी ऍसिड! पण नेमकं काय आहे? ओमेगा 3 फॅटी ऍसिड. ओमेगा 3 हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटचा एक प्रकार आहे. ओमेगा 3 हे असे फॅटी ऍसिड आहेत, जे शरीरात स्वतः बनत नाहीत. हे आपल्या खाण्यातून मिळते. ओमेगा 3 हे माश्यापासून मिळते व काही प्रमाणात भाज्यामधून आपणास मिळते.
1. ओमेगा 3 एलडीएल कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते व हृदयाच्या आजारापासून बचावते.
2. ओमेगा 3 रक्ताचा स्तर कमी करून हृदय बरं करण्यात मदत करते. यांच्या सेवनाने ब्लॉकेजेस वाढणं कमी होऊ शकतं.
3. कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करण्यास मदत करते.
4. ओमेगा 3 हे डिप्रेशन आणि तणाव कमी करू शकतं तसाच मानसिक विकार ही नीट करण्यात मदत करतं.
5. ओमेगा 3 मुळे गर्भवती महिला आणि बाळाच्या विकासाला चालना देण्यास मदत करते. बाळाच्या डोळे व मेंदूच्या विकासाला मदत करतं.
6. टाईप 2 डायबेटिस रुग्णांसाठी ओमेगा 3 फायदेशीर ठरतं.
7. सांधेदुखी मुळे होणारा त्रास आणि वेदना कमी करण्यात ओमेगा 3 मदत करते. हाडं आणि त्यांच्या नजीकचे टिश्यूज मजबूत होतात.
8. प्रतिकार क्षमता वाढवण्यात मदत करते.
9. ओमेगा तीनच्या सेवनानं वाढत्या वयातील डोळ्यांच्या समस्या कमी करण्यात मदत करते.
10. ओमेगा 3 आपल्याला अक्रोड, सूर्यफूल बी, टोफू, ब्रोकली, फ्लॉवर, जवस, चीअसिड्स, कोड लिव्हर ऑइल, सोयाबीन ऑइल, ऑयस्टर, अंडे, कॅनोला ऑइल, मासे, साल्मन फिश ह्या मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886