Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तेलाच्या मसाजाचे हे फायदे तुम्हाला अचंबित करतील!

by प्रभात वृत्तसेवा
February 24, 2021
in लाईफस्टाईल
A A
तेलाच्या मसाजाचे हे फायदे तुम्हाला अचंबित करतील!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

डॉ. एस. एल. शहाणे

हल्ली त्वचेचा मसाज करण्यासाठी ऑइल क्‍लेसिंग मेथड (ओसीएम) या उपचारपद्धतीचा वापर केला जात आहे. या उपचारपद्धतीत त्वचेच्या छिद्रांमध्ये बसलेली घाण आणि जंतू नैसर्गिक पद्धतीने म्हणजे भाज्या, फळं आणि औषधी वनस्पतींमधून मिळवलेल्या तेलाने काढता येतात. या उपचारपद्धतीत वापरलेली तेलं त्वचेचं संरक्षण करतात. त्यांचं पोषण करतात. याच्या जोडीने त्वचेची झालेली हानीही भरून काढतात.

फायदे
-त्वचेतील ओलावा वाढण्यास मदत होते. तिचा पीएच बॅलन्स झाल्याने त्वचा उजळते.
-ब्लॅकहेड्‌स, छिद्रांमधली घाण आणि चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल निघून जायला मदत होते.
कोरडया त्वचेचं तेलामुळे पोषण होतं. त्वचेचा पोत सर्वत्र सारखा बनतो.
-चेहऱ्याला दररोज तेलाने मसाज केल्याने त्वचेचं रक्ताभीसरण सुधारतं. त्वचेच्या पेशी बळकट बनतात. मृत पेशी चटकन काढून टाकता येतात.
सर्वात प्रभावी फेसपॅक म्हणून ओसीएमचा उल्लेख करता येईल, जो त्वचेला उत्तम संरक्षण पुरवतो.

सर्दी, शिंका, खोकला
वातावरणातील असलेल्या धूलिकणांमुळे सगळ्यांनाच त्याचा खूप त्रास होतो. याचा त्रास किरकोळ वाटत असला तरी नंतर तो त्रासदायक ठरातो. यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुडयांना आतून तिळाचे तेल लावावे.

दमा
दमा हा स्वतंत्र आजार आहे. यासाठी धूर, धूळ असणारे रस्ते टाळावेत. बाहेर जाण्याआधी नाकपुडयांना तिळतेल लावावे. चेहऱ्याला रुमाल बांधावा. नियमित नस्य करावे. आंघोळीच्या आधी छातीला तिळतेलाने मालिश करावे. नियमितपणे 10 मिनिटं व्यायाम करावा. कांद्याचा रस, आल्याचा रस, तुळशीची पाने आणि मध योग्य प्रमाणात वापरल्यास दमा नष्ट होऊ शकतो.

डोळ्यांचे विकार
डोळे जास्त लाल झाल्यास किंवा डोळ्यांतून जास्त पाणी येत असल्यास गुलाबपाण्याने डोळे धुवावेत. गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घडया डोळ्यांवर ठेवाव्यात. यामुळे डोळ्यांस आराम मिळतो. नेत्रतर्पण केल्यास डोळ्यांचे विकार बरे होऊन त्यांचे आरोग्य सुधारेल.

घसा बसणे / जळजळ होणे
वेलदोड्याचे दाणे आणि साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून घसा बसण्यावर व जळजळण्यावर आराम मिळू शकतो.

मान, पाठ, कंबरदुखी
स्नायू दुखल्यामुळे त्रास असेल तर योग्य त्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. तसेच औषधी तेलाने मसाज करून औषधी काढा प्यावा. मणक्‍याच्या विकारामुळे मान, कंबरदुखी असल्यास मानेचे, कंबरेचे काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, आणिकाढा प्यावा. औषधी तेल, काढा यांचा बस्ती (एनिमा) घ्यावा. अशा प्रकारे काळजी घेतल्यास आणि योग्य त्या वैद्यांकडे जाऊन सल्ले घेतल्यास आपण या आजारांना टळू शकतो.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife styleMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar