Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Obesity In Kids : तुमची लहान मुलं लठ्ठ होत चाललीयेत का ?

by
July 11, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Obesity In Kids : तुमची लहान मुलं लठ्ठ होत चाललीयेत का ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

लहान मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा ही मोठी समस्या आ वासून उभी राहिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2020 मध्ये पाच वर्षाच्या आतील 39 दशलक्ष मुलांमध्ये लठ्ठपणा दिसत आहे. पाच ते 18 वयाच्या मुलांमध्ये सुमारे 34 कोटी मुलांचे वजन जास्त आहे किंवा ते लठ्ठ आहेत.

भारतातील ही परिस्थिती आणखी चिंताजनक होत आहे. चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्व्हेनुसार, पाच वर्षाच्या मुलांचे प्रमाण 2.1 टक्‍के होते त्यावरून पाचव्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात 3.4 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.
मुदतपूर्व काळात जन्माला आलेल्या बालकांमध्ये त्यांची चयापचयक्रिया संथ होते. त्यामुळे मुलांचे वजन वाढण्याबरोबर खाण्याची क्रिया जास्त वाढते. याशिवाय, नवजात अतिदक्षता विभागात मुदतपूर्व अर्भकांना ठेवल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत घटक तयार होतात. म्हणजेच, कॅलरीचे प्रमाण वाढते आणि शारीरिक क्षमता घटते.

याचा अर्थ असा नाही की, सर्वच मुदतपूर्व बालकांमध्ये स्थूलता येत नाही. आनुवंशिकता, पर्यावरण, बदलती जीवनशैली यामुळे सुद्धा स्थूलता वाढण्यास मदत होते. त्यामुळे लहान वयात मुलांना धोका निर्माण होतो. स्थूलता वाढीमुळे इन्सुलिनची पातळी वाढू शकते. त्यामुळे मुलींमध्ये विशिष्ट प्रकारची संप्रेरकाची वाढ होते तर अशाच प्रकारच्या विशिष्ट संप्रेरकाची मुलांमध्ये वृषणात कमी प्रमाणात वाढ होते. त्यामुळे मुलींमध्ये लवकर तर मुलामध्ये उशिरा तारुण्य येते.

लवकर तारुण्य आल्याने मुलींना स्तनाच्या कर्करोगाचा, पुनरुत्पादन क्षमतेची समस्या, मानसिक आजार यासारख्या तर उशिरा तारुण्य आल्याने मुलांमध्ये हाडांचा तसेच उंचीच्या समस्या निर्माण होतात. मुदतपूर्व बालकामध्ये स्थूलतेचा धोका कमी करण्यासाठी कमी वयातच मुलामध्ये आरोग्याच्या दृष्टीने खाण्याच्या चांगल्या सवयी लावणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
नवजात बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात तसेच त्यांना योग्य आहार कसा दिला जावा याबाबत चांगले मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
लहान मुलांमध्ये वाढती स्थूलता रोखण्यासाठी मोठे आव्हान असून त्यात शाळा महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात. शाळांमध्ये मुलासाठी याबाबतचे धडे दिले गेले पाहिजेत. स्थूलता टाळण्यासाठी योग्य आहार-विहार करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. फळे, भाजीपाला, कमी फॅट असलेली डेअरी पदार्थ, तृणधान्ये यासारखे घटक शाळा मुलांना देऊ शकतात. प्रौढ मुलांमध्ये खेळासह शारीरिक प्रशिक्षण दिल्यास त्यांना नियमित व्यायामाची सवय लागू शकते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. सांघिक खेळ, पळणे, पोहणे यासारखे वैयक्‍तिक गोष्टी या शारीरिक शिक्षणाची उदाहरणे आहेत.

पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्‍तीमध्ये मुलासाठी ते खरेदी करत असलेल्या पदार्थाबाबत त्यांच्यात जनजागृती करणे गरजेचे आहे. सध्याच्या सोशल मीडियात पदार्थाच्या आरोग्यदायी असल्याचे भासविणारे चुकीचे लेबल लावले जातात. त्यामुळे. पालक असे पदार्थ खरेदी करतात. मात्र त्या पदार्थामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे स्थूलता वाढण्यास हे घटक कारणीभूत ठरतात.
एकूणच, जंक फूडच्या जाहिराती, आरोग्यास अपायकारक जीवनशैलीबाबत शिक्षण, पालक आणि काळजी घेणाऱ्या व्यक्‍तीमध्ये जनजागृती, आरोग्याच्या दृष्टीने खाण्यालायक पदार्थ आकर्षक आणि सहज उपलब्ध होतील असे वातावरण तयार करणे यासारख्या गोष्टीतून मुलांना स्थूलता रोखण्यासाठी मार्गदर्शन करता येईल.

================

The post Obesity In Kids : तुमची लहान मुलं लठ्ठ होत चाललीयेत का ? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar