साहित्य :
एक वाटी निवडलेली कोथिंबीर, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, आठ-दहा हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा मीठ, थोडे जिरे, चवी पुरती साखर
कृती :
कोथिंबीर, मिरच्या, कोबरे, मीठ,जिरे, प्रथम एकत्र वाटावे.मग साखर घालून कोरडी वाटल्यास किंचित पाण्याचा हबका मारून मिक्सरवर साथी करावी. आवडत असल्यास थोडा लसूण घालावा. वरून लिंबू पिळावे. ही चटणी फीजशिवाय चार दिवस टिकते.
लोणचे कसे तयार करावे ? जाणून घ्या सोप्या रेसिपी
चमत्कारीक गुणधर्म असलेली लसूण- जवस चटणी रेसिपी