नवी दिल्ली: महिलांच्या आरोग्याची काळजी करत सरकारने आपल्या जन औषधी विभागा मार्फत विकल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅप्किन्सनच्या किंमतीत घट केली असून आता हे नॅप्किन्स जन औषधी विभागात केवळ एक रुपयांना उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
या संदर्भात माहिती देताना राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 27 ऑगस्ट पासून सरकारच्या जन औषधी विभागाद्वारे विकल्या जाणाऱ्या सुविधा या सॅनिटरी नॅप्किन्सच्या किंमतीत घट करत असून पुर्वी 2 रुपये 50 पैशांना मिळणारे हे नॅप्किन्स आता 1 रुपयाला विकले जातील.