Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

No Onion Garlic Sabji : पितृपक्षात कांदा-लसूण टाळा; या सात्त्विक भाज्या ठरतील उत्तम पर्याय

by
December 13, 2025
in रेसिपी
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

No Onion Garlic Sabji: पितृपक्ष हा धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक नियमांचे पालन करण्याचा महत्त्वाचा काळ आहे. या दिवसांत अनेक कुटुंबे सात्त्विक आहार घेतात. सात्त्विक आहारात कांदा आणि लसूण वर्ज्य मानले जात असल्याने रोजच्या जेवणात वैविध्य राखणे काहींना कठीण जाते. परंतु, कांदा-लसूण न वापरता देखील झटपट, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात.

धार्मिक आस्था आणि आरोग्य लक्षात घेऊन खालील भाज्या विशेष लोकप्रिय मानल्या जातात :

बटाटा-टोमॅटोची भाजी

उकडलेले बटाटे, टोमॅटो, जिरे, हिंग, हळद आणि धणेपूड यांच्या सहाय्याने ही भाजी सहज बनते. गरम तेलात फोडणी देऊन टोमॅटो व मसाले परतावे आणि त्यात बटाटे घालून थोडे उकळवले की भाजी तयार.

भोपळ्याची आंबट-गोड भाजी

भोपळ्याचे तुकडे करून जिरे-हिंगाची फोडणी दिलेल्या कढईत टाकले जातात. त्यात मसाले, थोडा गूळ, आमचूर व बडीशोप पावडर टाकून शिजवले की आंबट-गोड चवीची भाजी तयार होते. पुरी किंवा कचोरीसोबत ही भाजी उत्तम लागते.

दुधी भोपळ्याची भाजी

दुधी भोपळ्याचे चौकोनी तुकडे करून हळद, मिरची व जिरे-हिंगाची फोडणी देऊन शिजवल्यास ही हलकी, पचायला सोपी भाजी तयार होते. दुपारच्या सात्त्विक जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे.

मिक्स व्हेज भाजी

फुलकोबी, गाजर, बीन्स, बटाटा असे हंगामी भाज्यांचे मिश्रण घेऊन त्यात मसाले, टोमॅटो आणि थोडीशी क्रीम टाकून ही भाजी बनवली जाते. चवीला समृद्ध आणि पौष्टिकतेने भरलेली अशी ही डिश सर्व वयोगटांना आवडते.

पनीर मटर भाजी

कांदा-लसूण न वापरता फक्त टोमॅटोची प्यूरी, हळद, धणेपूड, गरम मसाला आणि थोडे दूध वापरून ही भाजी केली जाते. त्यात पनीर व मटर घालून उकळल्यास खास चवदार पदार्थ तयार होतो.

तज्ज्ञांच्या मते, पितृपक्षात कांदा-लसूण टाळून तयार केलेल्या अशा भाज्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात. धार्मिक नियमांचे पालन करताना चव आणि वैविध्य टिकवण्यासाठी हे पर्याय विशेष उपयुक्त ठरतात.

Join our WhatsApp Channel

The post No Onion Garlic Sabji : पितृपक्षात कांदा-लसूण टाळा; या सात्त्विक भाज्या ठरतील उत्तम पर्याय appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar