नवजात अर्भकाला गरम, कोंदट आणि दमट वातावरणात ठेवण्यापेक्षा कुलर किंवा एअर कंडिशनर (एसी) वापरणे नक्कीच सुरक्षित आहे. मात्र, बाहेरील तापमान अधिक असेल, तर एसी/एअर कुलर्स वापरणे सुरक्षित आहे. तापमान 28-30 अंश सेल्सिअसहून अधिक असेल, तर बाळाला एसी/एअर कुलरशिवाय अस्वस्थ वाटू शकेल. एका विशिष्ट तापमान श्रेणीत बाळ अगदी आरामात राहू शकते आणि स्वत:च्या शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी त्याची किमान ऊर्जा वापरली जाते. एअर कंडिशनर किंवा कुलर वापरताना तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.
खोली खूप थंड होऊ देऊ नका खोली खूप थंड होणार नाही, याची काळजी आई-वडिलांनी घेतली पाहिजे. जर कुलर वापरत असाल, तर खिडक्या थोडया उघडया ठेवा, कारण कुलरमुळे वातावरणातील आर्द्रता वाढते आणि ते बाळाच्या शरीरासाठी योग्य नाही.
एसी किंवा कुलरमधून येणाऱ्या थंड हवेच्या झोतापासून बाळाला दूर ठेवा. हात-पाय संपूर्ण झाकले जातील, अशा पद्धतीने पातळ आवरणांचे कपडे बाळाला घालणे अत्यावश्यक आहे. यामुळे बाळाचे थंड हवेपासून संरक्षण होईल. एसी/कुलरचे सर्व्हिसिंग नियमित करून घ्या नियमित सव्र्हिसिंगमुळे या यंत्रांची कार्यक्षमता सुधारते. एसींचा मेंटेनन्स नियमित केला नाही, तर त्यातून जीवाणूंचा प्रादुर्भाव पसरू शकतो असेही निदर्शनास आले आहे.
बाळाच्या त्वचेतील ओलावा कायम ठेवा एसीचा बराच वापर केल्यामुळे बाळाची त्वचा शुष्क होऊ शकते. त्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. गरम हवा साधारणपणे वर जाते आणि खालील पृष्ठभाग थंड राहतो, त्यामुळे तुम्ही जमिनीवर एखादी पातळ गादी घालू त्यावर बाळाला ठेवू शकता. खोलीतून बाहेर पडल्यानंतर बाळाला लगेचच उष्ण जागी नेऊ नका. तापमानात अचानक होणारा बदल तुमच्या बाळाच्या शरीराला सहन होणार नाही. त्याऐवजी एसी बंद करा आणि बाळाला बाहेरच्या तापमानाची सवय होऊ द्या. एअर कंडिशनर सुरू करण्यापूर्वी खिडक्या उघडून खोलीतील हवा बाहेर जाऊ द्या.
प्रिमॅच्युअर बाळांची विशेष काळजी मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांची उष्णता नियमन क्षमता कमी असते. त्यामुळे बाळ मुदतपूर्व जन्मलेले असेल, तर खोलीतील तापमान अंश सेल्सिअसहून अधिक राहील, याची काळजी घ्या. बाळाच्या शरीराचे तापमान व बाहेरील तापमानावर सतत लक्ष ठेवून त्याप्रमाणे एसीचे तापमान राखणे गरजेचे आहे.
बाळाचे शरीर व त्याचे डोके तपासा. त्याची पावले, डोके, छातीच्या तुलनेत गार असतील, तर बाळ कोल्ड स्ट्रेसखाली आहे, म्हणजेच त्याला हायपोथर्मियाचा धोका आहे, असा याचा अर्थ होतो. मात्र, छाती आणि शरीराची टोके दोन्हीही थंड झाली आहेत, याचा अर्थ त्याला कदाचित हायपोथर्मिया झाला आहे आणि रिवॉर्मिगची गरज आहे. बाळाला चांगले गुंडाळून ठेवणे आवश्यक आहे.
नवजात बालकांचा क्षयरोगामुळे मृत्यू
भारतात पाच वर्षाखालील प्रत्येकी दहापैकी सात बालकांत रक्तक्षय आजार आढळत असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. इतकेच नाहीतर पुरुषांच्या तुलनेत महिलांना क्षयरोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. गर्भवती महिलांना क्षयरोग झाल्यास तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला क्षयरोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारतात बाळंतपणाच्या काळात 22 टक्के नवजात बालकांचा क्षयरोगामुळे मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात बहुतेक भागातील 42 टक्के लहान मुलांत रक्तक्षयाचा प्रादुर्भाव आढळून येतो. रक्तक्षयामुळे लहान वयातच मुलांची वाढ खुंटते. हा आजार शाळेत जाण्याच्या आधीच्या वयात मुलांमध्ये 27 टक्के आढळतो. पुरुषांत क्षयरोगाचे प्रमाण 28 टक्के आहे. तर गर्भवती महिलांत तो सर्वाधिक 42 टक्के आढळतो. त्यामुळे महिलांमधील रक्तक्षय हे बाळंतपणातील व नवजात अर्भकाच्या मृत्यूला कारण ठरतो.
याशिवाय रक्तक्षयाच्या रुग्णांत कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. रक्तक्षय झालेल्यांना थकवा येणे, अंग फिकट पडणे, छातीतील धडधड वाढणे आणि धाप लागणे अशी लक्षणे आढळतात. रक्तक्षयाचे परिणाम मुलांसाठी घातक ठरू शकतात. मातेच्या गर्भात याच काळात नवजात बालकाचे शरीर, मेंदू यांची वाढ होत असते.
रक्तक्षय हा कुपोषणाचा प्रकार आहे.
रक्तातील तांबडया पेशी शरीरातील विविध भागांना पुरेसा प्राणवायू पुरवत नाही, त्यावेळी हा आजार होतो. या आजारात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य स्तराच्या कमी असते. याचे कारण शरीरातील महत्त्वाच्या पोषक द्रव्यांचा अभाव, त्याची कारणे अनेक आहेत.
लोह, फॉलिक आम्ल, जीवनसत्त्व, प्रथिने, अमिनो आम्ल, जीवनसत्त्व अ, क आणि ब गटातील अन्य जीवनसत्त्वे कमी झाल्याने रक्तक्षय होण्याची शक्यता असते. कुठल्याही स्वरूपाचा रक्तक्षय हा घातकच असतो.
15 टक्के बालके कमी वजनाची
सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात 15 टक्के नवजात अर्भके कमी वजनांची असल्याचे उघडकीस आले आहे. तर बालकमृत्यूच्या प्रमाणातही झपाटयाने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरता आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या काळात आठ लाख 20 हजार प्रसूती झाल्या. यांपैकी एक लाख 12 हजार बालके ही कमी वजनाची असल्याचे समोर आले आहे. ज्या बालकांचे वजन अडीच हजार ग्रॅमपेक्षा कमी आहे, अशी बालके कमी वजनाची म्हणून नोंद होते.
यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, या जिल्ह्यांत हे प्रमाण टक्के इतके आहे. टक्के महिलांच्या प्रसूती या रुग्णालयात होत आहेत. चिंतेची बाब म्हणजे प्रसूती झालेल्या मातांपैकी दहा हजार मातांना रक्तक्षय असल्याची माहिती समोर आली आहे. अशा मातांना लोहाच्या गोळ्या दिल्या जात असल्याचे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सुधाकर कोकणे यांनी सांगितले.
भारतात दरवर्षी दोन कोटी 70 लाख बालके जन्माला येतात. त्यापैकी 36 लाख बालके नैसर्गिक प्रसूतीपूर्वी जन्माला येतात. तर वैद्यकीय कारणात्सव तीन लाख बालके दगावतात. आदींची दखल घेऊन केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. राज्यातील माता व बाल मृत्यू दर कमी करणे गरजेचे आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने जननी शिशू सुरक्षा योजना सुरू केली आहे.
त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतरही रुग्णालयात विनामूल्य ने-आण केली जाते. तर नैसर्गिक प्रसूती झाल्यास मातांना रुग्णालयात तीन दिवस विनामूल्य जेवणाचीही सोय केली जात आहे. सिझेरियन झाल्यास सात दिवस विनामूल्य जेवणाची सोय केली जाते.
-डॉ. शितल जोशी