Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

New Year Resolution 2025: नववर्षात करा ‘हे’ 5 संकल्प, 2025 ठरले तुमच्यासाठी खास

by
December 30, 2024
in लाईफस्टाईल
A A
New Year Resolution 2025: नववर्षात करा ‘हे’ 5 संकल्प, 2025 ठरले तुमच्यासाठी खास
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

New Year Resolution 2025 Ideas: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे दिवस शिल्लक राहिले आहेत. 2024 हे वर्ष नक्कीच तुमच्यासाठी खास ठरले असेल. यावर्षात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, आयुष्यात नवीन टप्प्यांवर पोहोचला असाल. यावर्षात काहींना चांगले-वाईट अनुभवही आले असतील. मात्र, आता 2025 मध्ये पदार्पण करताना जुने विसरून नवीन संकल्प करणे गरजेचे आहे.

बऱ्याचवेळेला आपण नववर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प पूर्ण होत नाही. हे संकल्प अवघे काही दिवसच टिकतात. मात्र, काही छोटे-छोटे संकल्प यावर्षात तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता.

डिजिटल डिटॉक्स

आपल्या सर्वांचाच स्क्रिन टाईम प्रचंड वाढला आहे. दिवसभर आपण स्मार्टफोन, लॅपटॉप वापरत असतो. मात्र, नवीन वर्षात स्क्रिन टाईम कमी करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. गरज नसताना स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा निर्धार 2025 मध्ये  करता येईल. हाच वेळ तुम्ही पुस्तके वाचण्यासाठी अथवा एखादा नवीन छंद जोपासण्यासाठी वापरू शकता.

बचतीला द्या प्राधान्य

तुमच्या नववर्षाच्या संकल्पामध्ये बचतीला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही विद्यार्थी असाल अथवा कंपनीत काम करत असाल, बचत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. यावर्षी अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त रक्कम कशाप्रकारे बाजूला पडेल, याचा विचार करा. दरमहिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याचा निर्धार करा. याचा तुम्हालाच भविष्यात फायदा होईल.

आरोग्याकडे लक्ष द्या

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या करिअरसोबतच आरोग्याकडे लक्ष देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेकजण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिम, योगा क्लास जॉइन करतात. परंतु, त्यांचा हा संकल्प वर्षभर टिकत नाही. मात्र, नववर्षात तुम्ही तुमच्या आरोग्य, राहणीमान, आहार याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

कुटुंब, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा

कामामुळे बऱ्याचवेळा कुटुंब, मित्र-मैत्रिणींना वेळ देता येत नाही. परंतु, यावर्षात तुम्ही त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा संकल्प करू शकता.

प्रवास करा

कामातून थोडा वेळ काढून नवनवीन जागांना भेट द्यायला हवी. ऑफिस, कॉलेज, घर या नियमित दिनक्रमाचा बऱ्याचवेळा कंटाळा येतो. त्यामुळे कामातून सुट्टी काढून मित्र-मैत्रिणी, कुटुंबासोबत प्रवास करायला हवा. नवीन वर्षात हे संकल्प तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरतील

Join our WhatsApp Channel

The post New Year Resolution 2025: नववर्षात करा ‘हे’ 5 संकल्प, 2025 ठरले तुमच्यासाठी खास appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar