Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

प्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

प्रौढांमध्ये आढळणा-या किंवा वैद्यकीय परिभाषेत टाईप २ म्हणून ओळखल्या जाणा-या मधुमेहाचे शास्त्रज्ञांनी तीन उपप्रकार शोधून काढले आहेत. त्यांच्या आधारावर अधिक परिणामकारक आणि नेमके उपचार करता येतील, असा आशावाद शास्त्रज्ञांच्या या गटाचे प्रमुख जोएल डडली यांनी व्यक्त केला आहे.

माऊंट सिनाई, न्यूयार्क येथील इकान स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सायन्स टड्ढान्स्लेशनल मेडिसीन नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या शास्त्रज्ञांनी टाईप २ मधुमेहाच्या ११,००० रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यात अन्य माहितीबरोबरच रुग्णांच्या जनुकीय रचनेबाबतही माहिती होती.

अभ्यासात असे दिसून आले की, मधुमेहाचा परिणाम या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारे होत होता. पहिल्या प्रकारात रुग्णांना मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम झाला होता. दुस-या प्रकारात चेतासंस्थेचे विकार आणि विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी झाल्या होत्या. तर तिस-या प्रकारात रुग्णांना एचआयव्हीची बाधा अधिक प्रमाणात झाली होती. या तिन्ही प्रकारच्या रुग्णांमधील जनुकीय रचनाही विशिष्ट प्रकारची होती. त्यानुसार आता टाइप-२ मधुमेहाचे तीन उपप्रकार पाडण्यात आले आहेत. या संशोधनाचा वापर करून मधुमेहावर अधिक अचूक व परिणामकारच उपाय करता येतील.

कोणामध्ये कोणता प्रकार आढळतो?
मधुमेहाचे सामान्यपणे टाईप-१ आणि टाईप-२ असे प्रकार पडतात. टाईप-१ हा प्रकार शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो आणि त्याचे प्रमाण कमी आहे. तर टाईप- २ हा प्रकार प्रौढांमध्ये आढळतो आणि तो जास्त सामान्य आहे. म्हणजेच मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी साधारण ९० टक्के रुग्ण टाइप-२ प्रकारचे असतात. दोन्ही प्रकारच्या मधुमेहांत अन्यही काही फरक आहेत. टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण अधिक असते आणि त्याला नियंत्रित करणारे इन्सुलिन स्वादुपिंडामध्ये नियमितपणे स्त्रवत नसते.

Tags: arogya jagardiabeteshealthnew variantsnew yorkType 2
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar