
navratri colours list : यंदाच्या नवरात्रीसाठी हे आहेत नऊ रंग; प्रत्येक दिवशी घाला ‘या’ रंगाचे कपडे
October 7th, 8:55amOctober 7th, 8:55am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
पुणे – शारदीय नवरात्री आजपासून सुरू होत आहे. नवरात्रीत दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची 9 दिवस पूजा करताना दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात. नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालतात, जाणून घेऊया.
पहिला दिवस : दुर्गा देवीचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करणे शुभ मानले जाते.
दुसरा दिवस : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. माता ब्रह्मचारिणीला हिरव्या रंग आवडतो. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी.
तिसरा दिवस : नवरात्रीच्या तिसरा दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे घालून पूजा करावी.
चौथा दिवस : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते. या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावी.
पाचवा दिवस : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. माता स्कंदमातेला पांढरा रंग आवडतो. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी.
सहावा दिवस : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. माता कात्यायनीला लाल रंग आवडतो. त्यामुळे लाल कपडे परिधान करून पूजा करावी.
सातवा दिवस : नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी निळ्या रंगाजे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी.
आठवा दिवस : नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावी.
नववा दिवस : नवरात्रीच्या नवव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावी