Shardiya Navratri – आश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शारदीय नवरात्र 24 ऑक्टोबरला दसऱ्याने समाप्त होईल. या नऊ दिवसांच्या सणात अनेक लोक उपवास (fasting) करतात. बहुतांश उपवास (upvas) हे सहसा एक दिवसाचे असतात किंवा आठवड्यातून अथवा महिन्यातून एकदा अशा प्रकारे असतात.
पण नवरात्रीमध्ये केले जाणारे उपवास सलग नऊ दिवसांचे असतात. त्यामुळे अशा वेळी उपवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात उपवास करताना भूक लागणे ही सामान्य बाब आहे.
परंतु, या दरम्यान भूकेवरील हे नियंत्रण देखील तितकेच महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. जेणे करून या नऊ दिवसांत तुम्ही तुमच्या भूकेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकता…
भरपूर पाणी प्या –
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करताना तुम्हाला भूक कंट्रोल होत नसेल, तर जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी पिऊन तुम्ही तुमची भूक सहज आणि प्रभावीपणे कमी करू शकालं. शक्यतो गरम पाणी पिण्याकडे लक्ष द्या. पाणी पिल्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि भूकही लागत नाही.
भरपूर फळे खा –
नवरात्रीमध्ये उपवास करताना भूक नियंत्रित ठेवण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे भरपूर फळे खाणे होयं. भूक दूर करण्यासाठी फायबरयुक्त फळांचा आहारात समावेश करणे, फायदेशीर ठरते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. फळांचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते.
चांगली झोप घ्या –
नवरात्रीमध्ये उपवास करताना चांगली झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. या दरम्यान रात्रीचे जागरण करू नका. जर तुमचे जागरण झाले तर तुम्हाला जास्तीची भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे, जागरण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे देखील तुम्ही तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते.
The post Navratri 2023 : नवरात्रीचे उपवास करताना भूक लागती? ‘हे’ उपाय करून मिळवा स्वतःवर कंट्रोल appeared first on Dainik Prabhat.