Sunday, April 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Health News : ‘या’ गोळीमुळे कर्करोगाचा धोका

by प्रभात वृत्तसेवा
March 4, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Health News : ‘या’ गोळीमुळे कर्करोगाचा धोका
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – कर्करोग होण्याचा धोका असल्याची शक्‍यता लक्षात घेउन मधुमेहाच्या रुग्णांना दिली जाणारी एक गोळी परत मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मधुमेह अर्थात डायबिटीसच्या रुग्णांना सामान्यत: ही गोळी दिली जाते. मेटफॉर्मिन हायड्रोक्‍लोराइड हे गोळीचे नाव आहे.

कर्करोग अथवा कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे प्रमाण यात जास्त असल्याचा दावा काही प्रख्यात माध्यमांनी सूत्रांच्या आधाराने दिलेल्या बातमीत केला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही हा दावा केला होता. डायबिटीसच्या या गोळीतील कॅन्सरला कारक ठरणाऱ्या निट्रोसोडिमेथीलॅमाइन (एनडीएमए) या घटकाचाही त्यांनी उल्लेख केला होता.

दरम्यान, हा खुलासा झाल्यानंतर संबंधित गोळ्या बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही जून महिन्यात एका बॅचच्या गोळ्या अशाच परत बोलावण्यात आल्या होत्या.
मार्कसन्स फार्मा या कंपनीचे हे औषध बाजारात टाइम कॅप लॅब नावाने विकले जाते. बाजारातून 500 एमजी आणि 750 एमजीच्या गोळ्या माघारी घेतल्या जात असून यापेक्षा कमी एमजीच्या गोळ्या धोकादायक नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी टाइप 2च्या मधुमेहाच्या रुग्णांना या गोळ्या दिल्या जातात. दरम्यान, डॉक्‍टर रुग्णांना या गोळ्यांऐवजी अन्य गोळ्या देत नाहीत, तोपर्यंत या गोळ्यांचे सेवन सुरू ठेवावे असेही अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले असल्याचा खुलासा संबंधित बातमीत करण्यात आला आहे.

Tags: againcancercancer riskhealth newsincreaseMetforminMetformin hydrochlorideoverrecalledrisk of cancertablets
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar