Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जपूया नवमातेचे मानसिक आरोग्य

by प्रभात वृत्तसेवा
March 9, 2021
in मानसिक आरोग्य
A A
जपूया नवमातेचे मानसिक आरोग्य
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

प्रसूतीवेदना आणि बाळाला जन्म देणे हे स्त्रीच्या आयुष्यातील बहुधा सर्वाधिक लक्षणीय प्रसंग असतात. या काळात शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत होणारे बदल, मानसशास्त्रीय आणि जैविक बदल इतके टोकाचे असतात की त्यामुळे ती प्रचंड मोठ्या शारीरिक व भावनिक स्थित्यंतरातून जाते. हे सर्व बदल शरीराच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करतात. हे सर्व बदल शरीराच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परीणाम करतात.

प्युरपेरियम काळात (प्रसुतीनंतर सहा महिन्यांचा काळ) स्त्रीची अवस्था अत्यंत असहाय असते, त्यातच नियंत्रण गमावल्याची भावना तिच्या मनात घर करते. नवमातेच्या इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये, तिच्या कौटुंबिक विश्‍वामध्ये प्रचंड बदल घडून येतात, त्यामुळे काही स्त्रियांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात काही अडचणी येतात, तर इतर काही स्त्रियांच्या मन:स्थितीमध्ये होणारा बिघाड अतिशय गंभीर आणि कमकुवत करणारा असू शकतो. याच स्थितीला ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणजे प्रसूतीपश्‍चात येणारे नैराश्‍य असे म्हणतात.

अनेकदा पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास सहन करणा-या स्त्रियांची व्यथा मूकच राहते. त्यांची मनोवस्था कुणाच्याही लक्षात येत नाही, कुणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच एक समाज म्हणून अशा स्थितीतून जाणाऱ्या स्त्रिया ओळखणे आणि त्यांना या मन:स्थितीसाठी योग्य ते उपचार मिळवून देण्यास मदत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.

गरोदरपणा आणि प्रसूतीनंतर उद्भवू शकणाऱ्या मानसिक समस्या: बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीमध्ये आढळून येणाऱ्या मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्या या पोस्ट-पार्टम ब्लू पासून क्‍लिनिकल डिप्रेशनपर्यंत अनेक प्रकारचे असू शकतात. 10-20 टक्‍के महिला गरोदरपणाच्या काळात नैराश्‍य आणि चिंतातूरता अनुभवतात. बाळाला जन्म दिल्यानंतरच्या पहिल्या वर्षांमध्ये तर हा धोका 8-10 टक्‍के इतका जास्त असू शकतो.

पोस्ट-पार्टम सायकोसिस हा एक गंभीर स्वरूपाचा भीतीदायक मानसिक आजार आहे. या आजाराला तातडीच्या मानसोपचाराची गरज असते कारण त्यामुळे मातेच्या जीवाला तसेच तिच्या बाळाच्या जीवाला धोका संभवू शकतो. बाळाला जन्म दिलेल्या बहुतांश स्त्रियांवर याचा परिणाम झालेला दिसतो. याशिवाय जनरलाइझ्ड एन्ग्झायटी डिसॉर्डर, पोस्ट ट्रॉमॅजिक स्ट्रेस डिसॉर्डर (पीटीएसडी) आणि ऑब्सेसिव्ह कम्प्ल्‌सरी डिसॉर्डर अशा समस्याही दिसून येतात. गरोदरपणाशी संबंधित एक विशिष्ट मानसिक स्थिती म्हणजे टोकोफोबिया, ज्यात प्रसूती, प्रसूतीवेदना यांविषयी टोकाची भीती वाटते. गरोदरपणाच्या दरम्यान अंमली पदार्थांचे सेवन करणे हा काही नवा प्रकार नाही व त्याचा माता आणि जन्माला न आलेले बाळ या दोघांवरही परिणाम होऊ शकतो.

गरोदर स्त्रियांमधील मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांना कसे ओळखावे? अशा प्रसंगी प्रेमाने वागून, काळजी घेऊन मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा महिलेशी बोलणे, तिने प्रसूतीचा काळ कसा घालवला याची विचारपूस करणे, तिला उदास वाटते आहे का, मन भरून येत आहे का याची चौकशी करणे असा साध्या कृतींमुळे तिच्या मनात दबलेल्या भावना बाहेर पडू शकतात. घरच्या कामांमध्ये मदत करणे, तिला पुरेशी झोप मिळेल याची काळजी घेणे, तिला काही काळ स्वत:साठी काढता यावा, तिच्या व्यावसायिक कामांमध्ये तिला मदत मिळावी यादृष्टीने प्रयतक्‍ केल्यास तिच्या मनावरील ओझे कमी करण्याच्या कामी दूरगामी परिणाम होऊ शकतो.

तिच्या वागण्यात काही बदल जाणवल्यास किंवा ती आपल्या स्वभावापेक्षा वेगळे वागत असताना दिसल्यास व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्या. गरोदर किंवा स्तनदा मातांची काळजी घेणारे डॉक्‍टर्स प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी आवर्जून प्रश्‍न विचारतत. त्यामुळे स्त्रीच्या वर्तणुकीत काही बदल दिसून आल्यास तिच्या कुटुंबातील सदस्य/देखभाल करणारे सदस्य यांनी असे बदल डॉक्‍टरांच्या लक्षात आणून द्यायलाच हवेत.
– डॉ. नेहा कर्वे , प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicCycling-pendlingdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogyaमानसिक आरोग्य
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar