Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Menopause Health: मेनोपॉजच्या काळात घ्या स्वतःची काळजी; योग्य आहार आणि जीवनशैलीने राहा निरोगी

by
February 17, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Menopause Health: मेनोपॉज हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. साधारणपणे वयाच्या चाळीशीनंतर ते पन्नाशीनंतर हा बदल अनुभवायला येतो. या काळात शरीरात हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात आणि त्याचा परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर दिसून येतो. मूड स्विंग्स, हॉट फ्लॅशेस, झोपेचा त्रास, वजन वाढणे, हाडांची ठिसूळता अशा अनेक समस्या जाणवू शकतात.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला नोकरी, व्यवसाय आणि घर या सगळ्यांची जबाबदारी सांभाळत असतात. त्यामुळे मेनोपॉजकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारली तर हा टप्पा सहज आणि निरोगीपणे पार करता येतो.

आहारात काय बदल करावेत?

मेनोपॉजदरम्यान महिलांना दररोज साधारण1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम लोह, 21 ग्रॅम फायबर यांची गरज असते. त्यामुळे आहार संतुलित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा – दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मासे, ब्रोकली, डाळी, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.
साखर आणि मीठ कमी करा – जास्त प्रमाणात साखर व मीठ घेतल्यास मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.
फळे आणि भाज्या नियमित खा – दररोज किमान दीड कप फळे आणि दोन कप भाज्या खाणे फायदेशीर ठरते.
सूर्यप्रकाश घ्या – हाडे मजबूत राहण्यासाठी दररोज 20 ते 30 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणे आवश्यक आहे.
हाय-फॅट पदार्थ टाळा – वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ कमी करा.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

एखाद्या डायटीशियन किंवा न्यूट्रीशनिस्टचा सल्ला घेतल्यास आपल्या शरीराच्या गरजेनुसार योग्य आहारयोजना करता येते. मेनोपॉज हा आजार नाही, तर आयुष्यातील एक नैसर्गिक बदल आहे. योग्य आहार, हलका व्यायाम, सकारात्मक विचार आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळे हा टप्पा अधिक सुलभ आणि आनंदी बनवता येतो.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar