प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची लक्षणे?
1. काही पुरुषांना तर वयाची चाळीशी संपली की हा त्रास चालू होतो.
2. दिवसातून 5 ते 6 वेळापेक्षा जास्त वेळा लघवीला जावे लागते. रात्रीतूनही हा त्रास जाणवू लागतो.
3. लघवी जोरात आल्यावर थेंब-थेंब कपड्यात होणे व लघवीला जाईपर्यंत त्यावर नियंत्रण न राहाणे.
4.लघवीची धार अत्यंत बारीक होणे व खूप जोर लागणे.
5. एका दमात लघवी न होता थांबत-थांबत लघवी होणे.
6. लघवीला जाऊन आल्यानंतर लघवी संपल्यावरही दोन – चार थेंब लघवी नंतर होणे.
7. लघवीतून रक्तस्त्राव होणे
घ्यावयाची काळजी
लवकरात लवकर मूत्ररोगतज्ज्ञास दाखवावे. जर वेळीच त्यावर उपचार केला नाही तर शिल्लक राहिलेल्या लघवीमुळे जंतूचा प्रादुर्भाव होतो. लघवीत जळजळ होते. परिणामी मूत्रपिंडाची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते.