संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. का म्हटले जाते याचा कधी विचार केला का आपण! बरेच लोक सकाळच्या नाश्त्याला अंडे खाणे पसंत करतात. दररोज अंडे खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत करते. अंड्यामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. सोबतच अंड्यामधून मिळणारे कॅल्शियम हाडांचे आरोग्य सुधारते. अंडे वर्षभर बाजारात उपलब्ध होतात व अंड्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.
- बऱ्याच जणांना प्रश्न असतो अंड्याने वजन किंवा कोलेस्टेरॉल वाढते ? योग्य प्रकारे अंड खाल्यास वजन घटण्यास मदत होते. आहारात अंड्याचा समावेश असणे अतिशय आवश्यक आहे.
- अंड्यातील बलकमध्ये पोषक घटकांसोबत कोलेस्टेरॉलही असते. म्हणून अंड्याचा पांढरा भाग दररोज खाल्ला तरी चालेल. परंतु अंड्याचा पिवळा भाग कधी तरी खावा.
- बराच वेळ भूक लागत नाही. भुकेवर नियंत्रण राहते व कंबरेचा घेर कमी होण्यास मदत करते.
-
गरोदरपणात अंडी खाण्यास फायदेचे असते. योग्य प्रमाणात अंडी खाल्याने बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेली प्रथिने मिळतात.
- अंड्यामध्ये ए, डी, ई, के ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
- आहारात पालेभाज्या, दुध याचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्यामध्ये लोह, आयोडीन, झिंक मिळतात.
-
उकडलेली अंडी खाल्याने हाडे मजबूत होतात. हाडांची झीज होत असेल तर उकडलेले अंडी खाल्याने ही झीज भरून निघते. ( egg eat benefits )
-
उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ असते जे केसांना मजबूत करते.
- अंड्यातील पोषक तत्वांमुळे मेंदूचाही विकास होतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- अंड्याचे विविध प्रकार केले जातात. बुरजी, ऑमलेट, बिर्याणी. बुरजी किंवा ऑमलेटमध्ये तेल किंवा बटर जास्त असल्याने ते खाणे टाळावे. अन्यथा वजन वाढू शकते.
- जेवणासाठी ब्राऊन राईस सोबत उकडलेले अंडी खाऊ शकता. फायबर आणि प्रोटीन मिळेल व दिवसभर एनर्जेटीक वाटेल.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.