Tuesday, September 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Mango Eating Tips: जेवणानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? तज्ज्ञांनी दिला स्पष्ट सल्ला

by
May 1, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Mango Eating Tips: उन्हाळा आला की सगळ्यांनाच आंब्याची आठवण येते. गोड, रसाळ आणि स्वादिष्ट असा आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. अनेकजण जेवण झाल्यानंतर लगेच आंबा खातात. पण ही सवय योग्य आहे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंबा खाणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी तो कधी आणि कसा खायचा, हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर सांगतात की, जेवणानंतर लगेच आंबा खाल्ल्यास तो शरीरासाठी धोकादायक नसतो, पण पचनावर परिणाम होऊ शकतो.  (Mango Eating Tips)

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर (नॅचरल शुगर) जास्त प्रमाणात असते. जेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा शरीर आधीच अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत असते. अशावेळी लगेच आंबा खाल्ल्यास पचनावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यामुळे पोट फुगणे, जडपणा किंवा अॅसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तसेच, जेवणानंतर लगेच आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढू शकते (ब्लड शुगर स्पाइक). विशेषतः ज्यांना मधुमेह (डायबिटीज) किंवा इन्सुलिन रेसिस्टन्सची समस्या आहे, त्यांनी या गोष्टीची जास्त काळजी घ्यायला हवी. अशा लोकांनी जेवणानंतर लगेच आंबा खाणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.  (Mango Eating Tips)

आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात की फळं ही जेवणाच्या ३० ते ६० मिनिटे आधी खाणं अधिक चांगलं असतं. जर जेवणानंतर आंबा खायचा असेल, तर किमान दीड ते दोन तासांचा अंतर ठेवणं योग्य ठरतं. यामुळे पचन व्यवस्थित होते आणि शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही.

आंबा खाण्याच्या काही सामान्य चुका देखील टाळायला हव्यात. अनेकजण आंब्याचा ज्यूस किंवा मिल्कशेक करून पितात. मात्र, आंब्याचा रस काढल्यावर त्यातील फायबर कमी होतं. त्यामुळे आंबा कापून थेट खाणं जास्त फायदेशीर ठरतं.  Mango Eating Tips

तसेच, आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं. यामुळे काहींना मळमळ, उलटी किंवा पोटात त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार आंबा आणि दूध एकत्र घेणंही पचनासाठी योग्य नाही, त्यामुळे आंबा मिल्कशेक टाळणंच चांगलं.

एकंदरीत, आंबा खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे, कारण त्यात व्हिटॅमिन्स, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. मात्र, चुकीच्या वेळेला किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आंबा खाताना योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत यांचा जरूर विचार करावा.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar