Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Makhana Makhani Recipe: मखाना फक्त स्नॅक्ससाठी नाही! घरच्या घरी बनवा क्रीमी आणि चविष्ट मखाना मखनी

by
September 30, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Makhana Makhani Recipe: वीकेंड आला की रोजच्या भाजी-पोळीपेक्षा काहीतरी वेगळं आणि चविष्ट खावंसं वाटतं. पनीर, मिक्स व्हेज किंवा कोफ्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि यावेळी लंचसाठी हटके पदार्थ बनवायचा असेल, तर मखाना मखनी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मखाना म्हणजेच फॉक्स नट्स अनेकदा स्नॅक्स म्हणून किंवा उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र, यापासून तयार केलेली क्रीमी आणि मसालेदार ग्रेव्ही लंच किंवा डिनरसाठीही छान लागते. मखान्याचा हलका क्रंच आणि मऊ, क्रीमी ग्रेव्ही यामुळे या भाजीची चव आणखी खुलते. ही भाजी बनवायलाही फार अवघड नाही. थोडी तयारी केली तर घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी मखाना मखनी तयार करता येते. रोटी, नान किंवा जीरा राइससोबत ही भाजी सर्व्ह करू शकता.

मखाना मखनीसाठी साहित्य

मखाना मखनी तयार करण्यासाठी ३० ग्रॅम मखाने, ४०० ग्रॅम फर्म टोफू, २०० ग्रॅम हाय-प्रोटीन ग्रीक योगर्ट, १ चमचा तूप, १ तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा, ३ लवंग, ५ काळी मिरी, २ काजू, १ मध्यम कांदा, ३ टोमॅटो, अर्धा चमचा जिरे, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घ्या.

मखाने आधी भाजून घ्या

सर्वप्रथम कढई गरम करून त्यात थोडं तूप घाला. त्यामध्ये मखाने टाकून मंद आचेवर भाजून घ्या. मखाने भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे ते जळणार नाहीत. मखाने कुरकुरीत झाले की गॅस बंद करा आणि ते एका प्लेटमध्ये काढून ठेवा. मखाने जास्त भाजू नका. त्यांचा हलका क्रंच राहणं महत्त्वाचं आहे. यानंतर ग्रीक योगर्ट किंवा स्कायर एका वाटीत घेऊन चांगलं फेटून ठेवा.

अशी तयार करा मखनी ग्रेव्ही

आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घाला. हे मसाले साधारण ३० सेकंद परतून घ्या. यानंतर त्यात काजू, चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. त्यासोबत टोफू, मीठ आणि थोडं पाणी घाला. पॅनवर झाकण ठेवून हे मिश्रण १२ ते १५ मिनिटं शिजू द्या.

कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झाले की गॅस बंद करा. मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन त्याची गुळगुळीत आणि क्रीमी पेस्ट तयार करा. ही पेस्ट पुन्हा पॅनमध्ये घेऊन मध्यम आचेवर साधारण ५ ते ७ मिनिटं शिजवा.

फोडणीमुळे वाढेल चव

आता एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर गॅस बंद करा. त्यात काश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला घाला. ही फोडणी तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये घाला आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. आता त्यात आधी भाजून ठेवलेले मखाने घाला. मखाने ग्रेव्हीमध्ये मिसळून मंद आचेवर आणखी २ ते ३ मिनिटं शिजवा.

शेवटी योगर्ट घाला

आता गॅस मंद करा. फेटलेलं ग्रीक योगर्ट किंवा स्कायर ग्रेव्हीमध्ये थोडं-थोडं करून घाला. ते एकदम घातल्यास ग्रेव्हीची रचना बिघडू शकते. त्यामुळे हळूहळू मिसळत राहा. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालं की वरून ताजी चिरलेली कोथिंबीर घाला.

गरमागरम मखाना मखनी तयार आहे. ही भाजी रोटी, नान किंवा जीरा राइससोबत सर्व्ह करू शकता. वीकेंडच्या लंचसाठी नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar