पुणे – आपली त्वचा नितळ आणि तजेलदार असणे हे सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचा तजेलदार व नितळ राहण्यासाठी थोडी काळजी घ्यावी-
पस्नान करताना हिरव्या चणाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे. चणाडाळीचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे.
पदूध पावडर 1 टेबल स्पून, मध 2 टेबल स्पून, 1 चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा, मानेला आणि हाताला चोळून लावावी. वाळल्यानंतर धुऊन टाकावी.
पकोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी. त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे.
– ओली हळद व मोहरी वाटून दररोज ब्लॅकहेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावी. हळूहळू ब्लॅकहेडस कमी होतात.
– ओट्सचे पीठ, चंदनाचे चूर्ण, 1 टेबल स्पून ओट व 1/4 टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावी. थोडया वेळाने धुऊन टाकावे. कच्च्या बटाटयाच्या पातळ चकत्या कापून चेहऱ्यावर पसरून 12-15 मिनिटे शांत पडावे. नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा. चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो. त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे.
– लिंबू, अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे. वीस मिनिटांनी धुवावे.
– त्वचा मृदू, मुलायम, स्निग्ध राहण्यासाठी दह्याने मसाज करावा.
– त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते. त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात. घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते.