Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

योग्य आहारातून साधा तुमचा फिटनेस

by प्रभात वृत्तसेवा
February 9, 2021
in आहार
A A
योग्य आहारातून साधा तुमचा फिटनेस
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे नोकरी करणाऱ्या महिलांना फिटनेससाठी व्यायाम करणेही कठीण होत आहे. त्यात जर नोकरी बैठे कामाची असेल तर मग वजन कमी करणे अगदीच जिकिरीचे होते. अशा स्थितीत योग्य आहार (डायट) तुमचं वजन कमी करू शकतो. 

व्यायाम दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. मात्र, वजन कमी करताना व्यायामासाठी नेहमीच वेळ मिळेल असेही नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारावर काम करू शकता. आपल्या जेवणात केवळ काही पौष्टिक पदार्थांचा सहभाग करणे आवश्‍यक आहे.

ब्रेकफास्ट करायलाच हवा
कामाला महत्त्व देणारे कामाला उशीर होऊ नये म्हणून अनेकदा सकाळचा नाश्‍ता न करताच बाहेर पडतात. ही एक मोठी चूक असून ती टाळायला हवी. संपूर्ण दिवस उत्साहवर्धक जाण्यासाठी आपल्या शरीराला दुपारच्या जेवणाआधी नाश्‍त्याची आवश्‍यकता असते. जर नाश्‍ता करणे टाळले तर तीव्र भूक लागल्यानंतर शरीरातील फॅट्‌स आणि साखर संपून जाते. दुसरीकडे नाश्‍ता केल्यास दिवसभरासाठी कॅलरी मिळतात आणि पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे ऑफिसच्या कामातही उत्साह टिकून राहतो.

कॉफी आणि चहाच्या सेवनावर नियंत्रण ठेवा
बहुसंख्य नोकरदार महिला काम करताना चहा किंवा कॉफी पितात. बऱ्याच कॉफी मशीनमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पावडरचा उपयोग होतो. त्यामुळे चहा किंवा कॉफीचे प्रमाण अगदी एक कपापर्यंत कमी असावे किंवा पूर्णपणे बंद करावे. यामागे एरिजोना विश्‍वविद्यालयाच्या संशोधनाचाही आधार आहे. येथील पर्यावरण मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर चार्ल्स गेरबा यांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे, की कामाच्या ठिकाणावरील किचनमध्ये 90 टक्‍क्‍यांपर्यंत कीटाणू असतात.
घरचे जेवण करण्याला पसंती द्या
ऑफिस फूड कोर्टमधून किंवा हॉटेलमधून जेवण मागवणे सोपे असते. मात्र, ही सवय आरोग्यदायी आहाराची नाही. नोकरी करणाऱ्या महिलांना दुपारी घरी बनवलेल्या पौष्टिक जेवणाची गरज असते. तुमची शक्ती वाढवण्यासाठी टिफिन बॉक्‍समध्ये भाजी, पोळी, भात, डाळ आणि सलाड असा चौकस आहार असणे अत्यावश्‍यक आहे. ऑफिसमधील चटपटे स्नॅक्‍स आरोग्याला अपायकारक आहेत. त्यापेक्षा फळांचे सेवन अधिक उपयोगी आहे. फिटनेस ठेवायची असेल तर जंक फूड आणि तेलकट पदार्थांपासून बाजूला राहायला हवे. स्नॅक्‍स घेताना त्यात प्रोटीन, कॅल्शियम, फॅट्‌स, कार्बोहायड्रेट्‌स (कार्ब्स), खनिज आणि फायबरचे भरपूर प्रमाण असावे. त्यामुळे वजनात तर मदत होतेच, सोबत आजारांपासून संरक्षणही मिळते. पॅकेज फूड स्वादिष्ट लागते आणि सहज उपलब्धही होते. मात्र, त्यामुळे शरीराला चांगलेच नुकसान होते.
डिनर देखील महत्त्वाचेच
रात्री जेवताना तुम्ही काय खाता याविषयी योग्य ती काळजी घ्यायला हवी. कार्बोहायड्रेट्‌स घ्यायला कंटाळा करू नका. त्यात कमी फॅट्‌स आणि जास्त तंतू (फायबर) असतात. त्यामुळे रात्री आराम करताना मदत होते. आरोग्यदायी वजनासाठी आरोग्यदायी आहाराचे नियोजन महत्त्वाचे आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या दैनंदिन पोषणाच्या गरजा वेगळ्या आहेत. नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या नोकरदार महिलांना व्यायामाशिवाय आपले वजन कमी करायचे असते. जर आहाराचे वेळापत्रक पाळले तर चांगल्या आरोग्याचा नक्कीच फायदा घेता येईल.

============

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyablood pressurefitnesshealthवजन कमी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar