सामग्री : साबुदाणे – ५०० ग्रॅम, तेल – अर्धा कप, उकडलेले बटाटे – २, हिरव्या मिरच्या – ३, कोथिंबीर – अर्धा कप, सैंधव मीठ, लाल मिरची पावडर -अर्धा छोटा चमचा, शेंगदाणे -अर्धा कप
कृती – साबुदाणे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवा. बटाटे उकडून घ्या. साबुदाणे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका. एका मोठ्या बाउलमध्ये बटाटे मॅश करून घ्या. त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सैंधव मीठ आणि भिजलेले साबुदाणे मिक्स करा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. वडे तयार करा. कढईमध्ये तेल गरम करत ठेवा आणि त्यात वडे तळून घ्या. साबुदाणा वडा तयार झाल्यानंतर शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
sabudana vada recipe in marathi