Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Lung Infection: तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला? दुर्लक्ष करू नका; फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचा असू शकतो इशारा

by
May 20, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Lung Infection: हवामान बदललं की सर्दी, पडसं आणि खोकल्याच्या समस्या वाढतात. अनेकदा साधा खोकला काही दिवसांत बरा होतो. पण जर खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत येणारा खोकला हा फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजारांचे संकेत देऊ शकतो.

खोकल्यासोबत कफ येणे, श्वास घेताना त्रास होणे, छातीत दुखणे, ताप, वजन कमी होणे किंवा रात्री घाम येणे अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.

दम्याचा इशारा असू शकतो   (Lung Infection)

जर खोकला दीर्घकाळ जात नसेल आणि छातीत जडपणा किंवा घरघर जाणवत असेल, तर ते दम्याचं लक्षण असू शकतं. दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि हवामान बदलल्यावर ही समस्या अधिक वाढू शकते. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

फुफ्फुसांच्या कर्करोगाचं लक्षण   (Lung Infection)

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, तीन आठवड्यांहून अधिक काळ खोकला कायम राहणं हे फुफ्फुसांच्या कर्करोगाचंही संकेत असू शकतं. विशेषतः खोकल्यात रक्त येत असेल, तर ही गंभीर बाब मानली जाते. अशा वेळी तातडीने वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.

 

टीबीचाही धोका

दीर्घकाळ खोकला राहणं हे क्षयरोग म्हणजेच टीबीचं लक्षण असू शकतं. कफात रक्ताचे डाग दिसणे, रात्री जास्त घाम येणे, शरीर कमजोर होणे आणि वजन झपाट्याने कमी होणे ही टीबीची सामान्य लक्षणे आहेत. टीबी हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यावर वेळेत उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे.

अॅसिड रिफ्लक्समुळेही होऊ शकतो खोकला

पोटातील अॅसिड परत घशात येण्याच्या समस्येला अॅसिड रिफ्लक्स म्हणतात. यामुळे घशात जळजळ, खवखव आणि सतत खोकला येऊ शकतो. अनेकांना हा खोकला साधा वाटतो, पण तो पचनसंस्थेच्या समस्येशी संबंधित असू शकतो.

फुफ्फुसांचा संसर्ग

दीर्घकाळ खोकल्यासोबत ताप, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तो फुफ्फुसांच्या संसर्गाचा संकेत असू शकतो. संसर्ग वाढल्यास न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेत डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सततचा खोकला हा शरीराचा इशारा असू शकतो. त्यामुळे घरगुती उपायांवर अवलंबून न राहता योग्य वैद्यकीय सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरतं.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar