जिन्स, पॅंट हे प्रकार हल्ली इतके कॉमन झालेत की आपल्याकडे छोट्या मुलींपासून ते अगदी मॅरीड वुमनपर्यंत सगळ्याच्या वार्डरोबमध्ये या पॅंट असतातच. निळ्या, काळ्या रंगाच्या जिन्स किंवा पॅंटची जागा रंगीबेरंगी जिन्सनं घेतली. त्यानंतर प्रिंटेट जिन्स पॅंट आल्यात. कॉलेज डेज, पार्टी, कॉलेज फेस्टिव्हल यांच्या खरेदीसाठी निघालात तर जिन्स आणि स्ट्रेट फिटिंग पॅंटसना चांगलीच फाईट देणारी लेडीज पॅंटसचा वेगळाच ट्रेंड रुजू झाला आहे.
हेरम
हेरम पॅंटस किंवा बॅगी पॅंटसची फॅशन तशी खूपच जुनी. मूळ टर्किश असलेल्या या फॅशननं सुरुवातीला काही पाश्चिमात्य फॅशन डिझायनरवर खूपच प्रभाव पाडला. यानंतर ही फॅशन पुन्हा विस्मृतीत गेली 1980 च्या दशकात ही फॅशन पुन्हा आली. त्यानंतर पुन्हा याचा ट्रेण्ड नाहिसा झाला. आपल्याकडे याच फॅशनपासून थोडी प्रेरणा घेत पटीयाला सलवार आलेच होते. आता गेल्या एक दोन वर्षांपासून या स्टाइलनं पुन्हा फॅशन वर्ल्डमध्ये एन्ट्री घेतली.
कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत अगदी घेरदार आणि गुडघ्यापासून खाली घट्ट असा या पॅंट्चा लूक. आतापर्यंत अशा पॅंटस फक्त हिप हॉपर्स घालतात असा काहीसा आपला समज होता. पण ही स्टाइल फक्त हिपहॉपर्स पुरती नसून तुम्हीसुद्धा कॅरी करू शकता. हेरममध्ये अनेक प्रकार आहे. आपल्याकडे कॉलेजिअन्समध्ये तशी चलती आहे ती हिप हॉप स्टाइल हेरमची. तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये फेरफटका मारला तर मल्टी कलर आणि स्थनिक प्रिंट असलेले कॉटनमधले हेरम दिसतील. या प्रकारातले हेरम काही जणांना खूपच छान दिसतात. यातल्या एका कलरमध्ये टीशर्ट किंवा सॅंडो घातली तर याचा वेगळाच लूक येतो.
प्रिटेंड हेरमचा कंटाळा आला असेल तर सगळ्यात बेस्ट काळ्या रंगाचं हेरम. जर तुम्ही बारीक असाल आणि तुमच्या कॉलेजमध्ये चालत असेल तर या हेरमवर क्रॉप टॉपही छान दिसतील. हेरमचा कपडा आणि त्याची स्टाइल यावर याची किंमत अवलंबून आहे.
सध्या सर्वांच्या पार्टी ड्रेसकोडमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे पलाझो. एरव्ही आपली फॅशन ही इतरांपेक्षा हटके असावी असं मानणाऱ्या या सगळ्यांना पलाझो या प्रकारानं इतकी भुरळ पाडली की कोणत्याही इव्हेंटला या तारका पलाझोमध्येच दिसायच्या. पलाझो हा नेमका प्रकार काही जणांना पटकन क्लिक होत नसेल. पलाझो म्हणजे बघायला गेलं तर रेट्रो स्टाइलच्या पायघोळ पॅंट. काही पॅंटसना तर इतका घोळ असतो की लांबून एखाद्या लॉंग स्कर्टसारखाच याला लूक येतो. तर काहींचा घोळ थोडा कमी असतो. या पलाझोचं वैशिष्टय म्हणजे एकतर तुम्ही हे पार्टी, कॅज्युअल, फॉर्मल अशा कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. काळ्या किंवा करडया रंगाची पलाझो घेतली तर ती कॉलेजमधल्या प्रेझेन्टेशनपासून, ऑफिस यूज ते रोजच्या वापरासाठीदेखील तिचा उपयोग होऊ शकतो.
सॅटीन सिल्कचे, लाइट रंगातले सेमी ट्रान्सपरन्ट शर्ट, टॉप यावर एकदम छान दिसतात. फंकी लूकसाठी साधी सॅन्डोदेखील या पलाझोवर छान दिसेल. काही दिवसांनी थंडी सुरू होईल, त्यामुळे या पलाझोवर स्लिवलेस टॉप आणि कॉटनचं जॅकेट किंवा स्कार्फदेखील छान दिसेल. यावर नवीन स्टाइलच्या स्टोनचा नेकलेस घातलात तर लूकमध्ये चांगला फरक जाणवेल.
पलाझो हे पायघोळ तर असतातच पण त्यांची लांबीही जास्त असते. त्यामुळे त्यावर हाय हिल्स सॅंडल्सच कॅरी करावेत. तुम्ही उंच आणि बारीक असाल तर ही पलाझोची फॅशन नक्कीच ट्राय करा. तर कमी उंचीच्या मुलींनी हाय हिल्स घातले तरी त्यांच्यावरदेखील पलाझो छान दिसतील.
या पलाझोमध्ये बेल्ट, बटन, फ्रंट नॉट, साइड नॉट, बो स्टाइल, इलॅस्टिक असे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या स्टाइलनुसार ते निवडू शकता. तर फ्लोरल प्रिंट, प्लेन पॉप अप, मॅट कलर, ऍनिमल प्रिंट, क्वर्कबॉक्स, पॅच प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आणि रंगातदेखील या बाजारात आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे निवडू शकता. पण तुम्हाला पार्टी, डेली वेअर अशा वेगवेगळ्या उपयोगासाठी पलाझो घ्यायची असेल तर प्लेन रंगाचा पर्याय एकदम उत्तम आहे. ट्रॅडिशनल युजसाठीदेखील काही ब्रॅंडेड दुकानात एथनिक पलाझो आहेत. बॉटमला हेवी वर्क केलेलं किंवा काठ असलेले, बाजूला लटकन लावलेले हे पलाझो दिसायला छान दिसतात.
पूल ऑन पॅंटस
पॅंटस म्हटलं की बटन लावा, चेन लावा मग त्यावर मॅंचिग असा बेल्ट शोधा अशी कटकट येतेच, पण ही कटकट टाळायची असेल तर पुल ऑन पॅंटसचा पर्याय मस्त आहे. या पॅंटसना ना झिप असते, ना बटन या पॅंटसच्या कमरेभोवती इलॅस्टिक असतं त्यामुळे बेल्ट लावण्याचंही टेन्शन नसतं. या पॅंटस शक्यतो प्लेन रंगातच बऱ्या दिसतात. या पॅंटस ऑफिस युजसाठीदेखील योग्य ठरतात. काही स्ट्रेट फिटिंगमध्ये आणि कमरेभोवती प्लेट्स अशा प्रकारच्या आहेत. काहीच्या पायाजवळ इलॅस्टिकदेखील आहे. या पुल ऑन पॅंट्सवर स्लिवलेस शर्ट किंवा फॉर्मल सॅटीन शर्टस छान दिसतात. हल्ली काही पुल ऑन पॅंटसवर प्लेबॉय, पोल्का डॉट्स, बनी, स्कल अशा वेगवेगळ्या प्रिंटदेखील आल्या आहेत. कॉलेजसाठी या पॅंटस चांगल्या दिसतात. काही दिवसांनी थंडी सुरू होईल. त्यामुळे पूर्ण बाह्यांचं टी-शर्टदेखील छान दिसेल.
– श्रुती कुलकर्णी