उन्हातान्हात बाहेर जाताना इतर सर्व गोष्टींबरोबरच आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे गॉगल ( sunglasses benefits for eyes ) उन्हात वापरायचा सामान्यत: काळसर वा निळसर काचा असणारा चष्मा. कधी काळी गॉगल ही फॅशन या सदरात मोडणारी वस्तू होती, पण आज ती फॅशनबरोबरच अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. गॉगल ही तरुणाईची लाडकी गोष्ट बनली आहे.
खेळाडू-खास करून क्रिकेटपटू तर मैदानात खेळतानाही गॉगल लावून खेळताना दिसतात. ते पाहून तरुणाईला गॉगल वापरण्याचा आणखी उत्साह येतो. गॉगल ( sunglasses benefits for eyes ) प्रत्येकाच्या आवडीची वस्तू बनली आहे. प्रत्येक जण त्याच्या आवडीने गॉगल घेतो. काही जण तर अगदी महिन्याच्या महिन्याला गॉगल बदलतात. त्यांच्या किमतीही काही शेकड्यांपासून तर काही हजारांपर्यंत असतात.
गॉगल ही गरजेची गोष्ट आहे हे मान्य केले, तरी पण प्रश्न असा पडतो की, गॉगल वापरताना आपण खरंच डोळे उघडे ठेवून गॉगल घेतो का? आणि वापरतो का? रस्त्याच्या कडेला मिळणारे वा एखाद्या पेट्रोल पंपाच्या बाजूला मिळणारे अगदी कमी किमतीचे गॉगल ( sunglasses benefits for eyes ) अनेक जण वापरतात. ते खरोखर उपयुक्त असतात का? फायदेशीर असतात का? त्यापासून काही त्रास तर होणार नाही? याचा विचार किती जण करतात? रस्त्यावरच्या गॉगल्सची एक गोष्ट झाली. आपण मोठ्या पॉश दुकानातून भरभक्कम रक्कम देऊन गॉगल खरेदी करतो, तेव्हाही ते आपल्या डोळ्यांना “सूट’ होतात का याचा विचार किती करतो?
डोळ्यांचे रक्षण हा गॉगल ( sunglasses benefits for eyes ) वापरण्यामागचा सर्वात मुख्य हेतू. हीच गॉगल ची सर्वप्रथम गरज. बाकी स्टाईल वगैरे दुय्यम गोष्टी. पण त्यांनाच अधिक महत्त्व दिले जाते हे एक कटू सत्य आहे. गॉगल घेण्यामागे कारण काय? बरेच जण स्टाईलसाठी गॉगल घेतात. काही जण डोळ्यात कचरा जाऊ नये, ऊन लागू नये, तसेच थोडी स्टाईल पण असावी म्हणून गॉगल घेतात. गॉगल मुळीच न वापरणाराही असा देखील एक वर्ग आहे.
खरं तर गॉगल ( sunglasses benefits for eyes ) ही एक अशी वस्तू आहे जी की प्रत्येकाने वापरावी, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत. फक्त आणि फक्त एकाच मुख्य हेतू साठी, ते म्हणजे डोळ्यांचे संरक्षण! आपण दिवसभरात भरपूर वेळ उन्हामध्ये वावरत असतो, मुख्य करून प्रवास करताना. घर-ऑफिस-घर हा तर आपला नित्यनियमचा अगदी न चुकणारा दररोजचा प्रवास. कधी सार्वजनिक वाहनाने, कधी स्वत:च्या दुचाकी-चारचाकी वाहनाने आणि प्रसंगी काही अंतर चालतसुद्धा आपण जात असतो. सूर्यप्रकाश वेगवेगळ्या किरणतरंगां (wavelength) पासून बनला आहे. त्यातले सर्वात घातक आहेत त्यातील अतिनील किरण म्हणजे णत ठरवळरींळेपी. हे थोड्या प्रमाणात जर शरीरावर पडले तर ते आपल्या शरीरात व्हिटॅमिन D च्या निर्मितीस चालना देतात, पण हेच प्रमाण जर जास्त झाले तर ते शरीरासाठी हानिकारक असतात.
आपले शरीर तर कपड्यांनी झाकलेले असते, पण डोळ्यांचे काय? ते तर सरसकट रोज UV Radiation सहन करत असतात. त्यापासून रक्षण करण्यासाठी गॉगल उपयुक्त ठरतात, नव्हे आवश्यकच असतात.
Extended exposure to the sun’s UV rays has been linked to eye damage, including cataracts, macular degeneration and photokeratitis that can cause temporary vision loss अशी माहिती गुगलवर सर्च केलं तर मिळते.
आपल्या डोळ्यांना UV Radiation पासून वाचवण्यासाठी UV protection असणारा गॉगल वापरावा. काही वेळेस गॉगल्स च्या स्टायलिश फ्रेम्समुळे त्यांची किंमत अधिक असू शकते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. असे महागडे गॉगल देखील 100% UV Protection देत नाहीत, त्यांची ती किंमत त्यांच्या stylish फ्रेम मुळे असू शकते. 100% UN-400 Protection असलेला गॉगल ( sunglasses benefits for eyes ) डोळ्यांचे 400 anometer wavelength पर्यंतच्या UVA, UVB, UVC radiation पासून संरक्षण देतो. फक्त डार्क शेड असलेला गॉगल णत झीीेंशलींळेप देतो हा समज चुकीचा आहे.
Polarised गॉगल हा एक वेगळा प्रकार आहे. हा चमकणाऱ्या प्रकाशात चांगली दृष्टी देण्याचं काम करतो. पण Polarised गॉगल असणाऱ्यांनी ह्या भ्रमात राहू नये की आपला गॉगल ( sunglasses benefits for eyes ) डोळ्यांचे UV Radiation पासून देखील संरक्षण करतो. Polarised+ 100% UV Protection, दोन्ही असलेला गॉगल सर्वोत्तम. हे सुंदर जग, सुंदर (आणि धडधाकट!) डोळ्यांनी अधिक सुंदर दिसेल, त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी.
– मृणाल गुरव