Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Lifestyle: हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवतील या दूध ड्रिंक्स; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

by
November 23, 2025
in लाईफस्टाईल
A A
Lifestyle: हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवतील या दूध ड्रिंक्स; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Lifestyle: हिवाळा सुरू झाला की थंड हवा मुलांच्या आरोग्यावर पटकन परिणाम करते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा कमी असते, त्यामुळे या काळात मुलांच्या आहाराची खास काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात दूधापासून बनणाऱ्या काही हेल्दी, टेस्टी ड्रिंक्स मुलांसाठी सर्वात चांगले पर्याय ठरतात. या ड्रिंक्समुळे शरीराला उष्णता मिळते आणि इम्युनिटीही मजबूत होते. मोठ्यांनीसुद्धा या ड्रिंक्सचा आनंद घ्यायला हवा.

दूधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, रिबोफ्लेविन, फॉस्फरस असे पोषक घटक असतात. मुलांच्या वाढीसाठी हे खूप आवश्यक आहे. दूधात जर काही नैसर्गिक घटक मिसळले तर त्याची पौष्टिकता दुप्पट होते.

चला तर मग, जाणून घेऊया हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवणाऱ्या 4 पौष्टिक ड्रिंक्सची रेसिपी.

1. खजूर–बदाम मिल्क

ही ड्रिंक मुलांना खूप आवडते आणि शरीराला भरपूर ऊर्जा देते.

साहित्य :
दूध
2–3 खजूर (जास्त गोड पल्प असलेले)
1 चमचा बदाम पावडर

कृती :

1. प्रथम बदाम हलकेसे भाजून त्याची पावडर करून ठेवा.

2. खजूराची बिया काढून छोटे तुकडे करा.

3. दूध उकळा आणि त्यात 1 चमचा बदाम पावडर व खजूराचे तुकडे घाला.

4. एक उकळी आली की गॅस बंद करा.

हे दूध मुलांना साखर न घालता देऊ शकता. बदाम पावडर वयाप्रमाणे कमी–जास्त करा.

2. हळद–केसर दूध

हा दूधाचा प्रकार हिवाळ्यात शरीर गरम ठेवतो आणि सर्दी–खोकल्यापासून संरक्षण करतो.

साहित्य :
दूध
3–4 केसर धागे
1–2 चिमूट हळद
थोडा गूळ किंवा मध

कृती :

1. दूध गरम करताना त्यात केसर आणि हळद घाला.

2. दूध उकळून गाळून घ्या.

3. थोडं कोमट झाल्यावर त्यात गूळ किंवा मध मिसळा.

खूप चविष्ट आणि हेल्दी असं हे दूध रात्री देऊ शकता.

3. बेसन–दूधाच सुडक (पंजाबी स्टाइल)

हिवाळ्यात शांत झोप येण्यासाठी पंजाबमध्ये हे सुडक खूप लोकप्रिय आहे.

साहित्य :
2 चमचे बेसन
1 चमचा तूप
1 ग्लास दूध
बदाम–पिस्ता तुकडे
केसर धागे
2 चिमूट काळी मिरी
2 चिमूट सोंठ पावडर
गूळ / मध / खजूर

कृती :

1. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेसन सोनेरी होईपर्यंत भाजा.

2. त्यात दूध घालून सतत ढवळत उकळी आणा.

3. नंतर बदाम–पिस्ता, केसर, काळी मिरी व सोंठ पावडर घाला.

4. शेवटी गोडासाठी गूळ किंवा मध घाला.

हे सुडक मुलांच्या शरीराला उष्णता देते आणि खूप पौष्टिक असते.

4. मसाला मिल्क

इम्युनिटी वाढवण्यासाठी मसाला मिल्क हे सर्वोत्तम गरम पेय आहे.

साहित्य (मसाला तयार करण्यासाठी) :
3 हिरवी वेलची
½ चमचा काळी मिरी पावडर
½ चमचा सोंठ पावडर
½ चमचा हळद
8–10 केसर धागे
12–15 बदाम पावडर
12–15 काजू पावडर

कृती :

1. वरील सर्व गोष्टी मिक्स करून एक मसाला तयार करा.

2. उकळणाऱ्या दुधात एक चमचा मसाला घाला.

3. छान सुगंधी, स्वादिष्ट मसाला मिल्क तयार!

हे दूध मुलांना थंडीपासून संरक्षण देते आणि शरीर शक्तीवान बनवते.

Join our WhatsApp Channel

The post Lifestyle: हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवतील या दूध ड्रिंक्स; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar