Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Lifestyle: न्यू ईयर पार्टीत झाली ओव्हरईटिंग? हे घरगुती उपाय देतील पोटाला दिलासा

by
January 2, 2026
in लाईफस्टाईल
A A
Lifestyle: न्यू ईयर पार्टीत झाली ओव्हरईटिंग? हे घरगुती उपाय देतील पोटाला दिलासा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Lifestyle : नवीन वर्षाचं स्वागत बहुतांश लोक पार्टी आणि खाण्यापिण्यात रमून करतात. ३१ डिसेंबरची रात्र असो किंवा नववर्षाचा पहिला दिवस… तळले-भाजलेले पदार्थ, जंक फूड आणि गोडधोड खाल्लं जातं. उत्साहात किती खाल्लं याचं भान राहत नाही आणि त्यामुळे ओव्हरईटिंग होते. याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी पोटावर दिसून येतो पोट जड वाटणं, गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणं किंवा अपचन अशा तक्रारी सुरू होतात.

मात्र अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. वेळेवर पोटाला आराम दिला तर ही समस्या लवकर कमी होऊ शकते. महागडी औषधं घेण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.

१) कोमट पाणी प्या

ओव्हरईटिंगनंतर सर्वात आधी कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स सक्रिय होतात आणि पोटातील जडपणा कमी होतो. गॅस बाहेर पडण्यासही मदत होते.

२) ओवा घ्या

ओव्यातील थायमॉल घटक पचन सुधारतो आणि गॅस-अॅसिडिटी कमी करतो. अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटदुखी व सूज कमी होते.

३) बडीशेप खा किंवा बडीशेपचा काढा प्या

बडीशेप पचनसंस्थेला शांत करते. त्यातील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्समुळे पोटफुगी व गॅस कमी होतो. म्हणूनच जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय उपयुक्त मानली जाते.

४) आल्याचा वापर करा

आल्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे पोटातील जळजळ, मळमळ कमी होते. थोडं आलं चावणं किंवा आल्याचा चहा पिणं पचनक्रिया वेगवान करतं.

५) थोडंसं चाला

जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी १०-१५ मिनिटं चाला. यामुळे पचन सुधारतं आणि गॅस होण्याची शक्यता कमी होते. हलकी वॉक अपचन आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते.

नववर्षाच्या सेलिब्रेशननंतर पोट बिघडलं असेल, तर हे साधे घरगुती उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

Join our WhatsApp Channel

The post Lifestyle: न्यू ईयर पार्टीत झाली ओव्हरईटिंग? हे घरगुती उपाय देतील पोटाला दिलासा appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar