ल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्यामध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्सच्यात स्वरूपात वाढणाऱ्या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात.
तीव्र लिंफोसायटिक ल्युकेमिया (एएलएल) सर्व वयोगटाच्या लोकांना होतो, पण हा कर्करोग 25% मुलांमध्ये आढळतो, यांतील सर्व प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्ता मुलांचे वय 15 वर्षांच्या खाली आहे.
हा कर्करोग बहुतांशी दोन व पाच वर्षे वयाच्या मुलांना प्रभावित करतो. प्रौढांमध्ये, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये साधारणपणे जास्त प्रमाणात आढळतो. अशा परिस्थितीत अपरिपक्व ल्युकेमिया पेशी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरो) संचित होतात आणि सामान्य रक्त उत्पादक पेशींना नष्ट करून टाकतात. ल्युकेमिया पेशी रक्तप्रवाहासह यकृत, प्लिहा, लिम्फ नोड्स, मेंदू व अंडकोषात पोहोचतात, जेथे त्यांची वाढ व विभाजन निरंतर चालू राहते. मेंदूला व पाठीच्या कण्याला आवरण घालणाऱ्या ऊतकांच्यान थरांना ह्या पेशी मेनेन्जूयटिस, रक्ताल्प ता (ऍनेमिया), यकृत व किडनी फेलियर होणे आणि इतर प्रकारची हानी पोहोचवू शकतात.
लक्षण आणि निदान
प्रारंभिक लक्षण म्हणजे पुरेशा रक्तपेशी उत्पादनाच्या बाबतीत अस्थिमज्जासार असमर्थ असणे. ताप आणि अत्यधिक घाम येणे, जे संसर्गाचा संकेत आहे, आणि जे अत्यंत कमी झालेल्या सामान्य पांढऱ्या रक्तपेशींचा परिणाम आहे. यामुळे ऍनिमियाची सामान्य लक्षणे आढळतात; जसे थकवा, अशक्तपणा, रंग फिकट पडणे जे अत्यंत कमी लाल रक्तपेशींचा परिणाम आहे.
ओरखडे किंवा जखम होणे व त्यातून रक्त वाहणे, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा प्लेटलेटच्या कमतरतेमुळे क्वचितप्रसंगी नाकातून रक्त येणे. मेंदूत ल्युकेमिया होणे, डोकेदुखी, वांत्या, चिडचिड होणे आणि अस्थिमज्जासारामधील ल्युकेमिया पेशींमुळे हाडे व अस्थिसंधींमध्ये दुखणे सुरू होऊ शकते. जेव्हा ल्युकेमिया पेशी यकृत आणि प्लिहेचा विस्तार करतात त्यावेळी पोट भरल्यांसारखे वाटणे आणि कधीतरी पोट दुखू लागणे हे ही होऊ शकते.
रक्त तपासणी, ही या रोगाचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी असलेली एक संपूर्ण रक्तगणना आहे, जी ह्या रोगाची प्रथम साक्ष आहे. पांढऱ्या रक्तपेशींची एकूण संख्या कमी झालेली दिसू शकते, सामान्यच असू शकते किंवा जास्त झालेली असू शकते, पण लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची संख्या सरासरी नेहमी कमीच आढळते. ह्याच्या जोडीला, सूक्ष्मदर्शी यंत्राच्या खाली पाहणी केल्यास, रक्ताच्या नमुन्यात पुष्कळशा अपरिपक्व पांढऱ्या रक्तपेशी आढळतात.
अचूक निदान आणि ल्युकेमियाचा प्रकार जाणून घेण्यासाठी नेहमी बोनमॅरो बायोप्सी करतात. उपचार उपलब्ध होण्यापूर्वी, हा आजार असलेले बहुतेक रोगी निदान झाल्यानंतर सुमारे 4 महिन्यांतच मरण पावत असत. आता, सुमारे 80% मुले व 30 ते 40% प्रौढ लोक ह्या रोगातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. बहुतेक लोकांच्या बाबतीत, किमोथेरेपीचा पहिला कोर्स रोगावर पूर्ण नियंत्रण मिळवून देतो.
तीन आणि सात वर्षांच्या वयातील मुलांमध्ये सर्वोत्तम पूर्वानुमान लावता येते. दोन वर्षांच्याच खालील मुले आणि इतर प्रौढांची स्थिती जास्त चांगली नसते. पांढऱ्या रक्तपेशींची गणना आणि ल्युकेमिया पेशीतील विशिष्टी गुणसूत्रातील असामान्यतः देखील परिणामावर प्रभाव टाकतात.
चिकित्सा
किमोथेरेपी अत्यंत प्रभावी आहे आणि हे उपचार हळूहळू देण्यात येतात. ल्युकेमिया पेशींना नष्ट करून पुन्हां एकदा अस्थिमज्जासंस्थेमध्ये सामान्य पेशींचा विकास घडवून आणणे हे प्रारंभिक उपचाराचे (प्रेरण किमोथेरपी) लक्ष्य आहे.
लोकांना काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडू शकते, अस्थिमज्जासार किती लवकर सुस्थितीत येतो त्याच्यावर हे अवलंबून आहे.
ऍनिमियावर औषधोपचार करण्यासाठी आणि रक्तप्रवाह थोपविण्यासाठी रक्त व प्लेटलेटचे आधान करण्याची (ट्रान्संफ्यूजन) गरज पडू शकते आणि बॅक्टिरियल संसर्गावर औषधोपचार करण्यासाठी प्रतिजैविक (अँटिबायोटिक्स) देण्याची गरज पडू शकते. एक अंतर्शिराद्रव आणि औषधांसह उपचार केले असता आम्लासारख्या हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करतात, जसे ल्युकेमिया पेशींना नष्ट करतांना यूरिक ऍसिडचे निर्गमन (बाहेर टाकले जाते) होते.
औषधांच्या पुष्कळशा संयोजनांचा वापर करण्याटत येतो, आणि औषधाचे डोसांचे काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत पुनरावर्तन करण्यात येते. मेंदू व पाठीच्या कण्याच्या ऊतींच्या थरांमधील ल्युकेमिया पेशींवर उपचार करण्यासाठी कर्करोग प्रतिरोधी औषधे सरळ मस्तिष्कमेरु द्रव्यात इंजेक्ट करतात.
मेंदूला हा किमोथेरेपी उपचार विकिरण संयोजनासह दिला जाऊ शकतो. तरीसुद्धा मेंदूमध्ये ल्युकेमियाचा विस्तार झाला असल्याचा अल्पसेदेखील लक्षण आढळल्यास, बचावात्मक उपचार म्हणून ह्या प्रकारचा उपचार देण्यात येतो; कारण मेंदूमध्ये मेनेंजायटिसचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता असते. सुरुवातीच्या गहन उपचारानंतर, काही आठवडे, उर्वरित ल्युकेमिया पेशी नष्ट करण्यासाठी जोड-उपचार (कंसोलिडेशन किमोथेरेपी) देण्य्ात येतो.
किमोथेरेपीच्या जोडीला इतर औषधोपचार किंवा सुरुवातीच्या काळात ज्या औषधांचा वापर करण्यात आला, तीच औषधे पुष्काळशा आठवड्यांच्या दरम्यान पुन्हा काही वेळा देण्यात येऊ शकतात. ह्यापुढील उपचार (अनुपालन किमोथेरेपी), सामान्यपणे ज्यामध्य्े कमी मात्रेचे डोस असतात, 2 ते 3 वर्षांपर्यंत चालू राहू शकतात.
काही असे लोक ज्यांच्या पेशींमध्ये विशिष्ट गुणसूत्रसंबंधी परिवर्तन आढळल्याने पुन्हा आजारी पडण्याचा धोका असतो, त्यांना पहिल्याच रीलॅप्सच्या काळात स्टेमसेल प्रत्यारोपण करून घेण्याचची शिफारस करण्यात येते. ल्युकेमियाच्या पेशी सामान्यपणे रक्त, अस्थिमज्जासार, मेंदू किंवा अंडकोषात पुन्हा दिसू शकतात (रीलॅप्सड कंडिशन). अस्थी मज्जासारामध्ये हा आजार पुन्हा प्रगट झाल्यास गंभीर ठरू शकतो.
किमोथेरेपी पुन्हा देण्यात येते आणि जरी सर्व लोक ह्या उपचारास चांगला प्रतिसाद देत असले तरी ही पुन्हा परत येणे ह्या आजाराचा स्वभाव आहे, विशेषत: दोन वर्षांपेक्षा लहान असलेली मुले आणि प्रौढ. जेव्हा ल्युकेमिया पेशी मेंदूमध्य्े पुन्हा प्रगट होतात, मेंदूच्या मेरू द्रवात आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा किमोथेरेपी औषधे इंजेक्टो करण्यात येतात. जेव्हा ल्युकेमिया पेशी अंडकोषात पुन्हां दिसू लागतात, किमोथेरेपीबरोबर विकिरण उपचार केला जातो.
ज्या लोकांना हा आजार पुन्हा झाला असेल, त्यांच्यावर किमोथेरेपीच्या उच्च डोसांसह ऍलोजेनिक स्टेमसेल ट्रान्स्प्लांटेशन केल्यास फार चांगला परिणाम होतो. पण प्रत्यारोपण तेव्हाच करता येते जेव्हा अशा व्यक्तीच्या स्टेम सेल घेतल्या असतील, ज्या पूर्णत: समानुरूप असतील (एचएलए मॅच्ड). दाता (डोनर) बहुतेक एखादे भावंडं (रोग्याचे भाऊ किंवा बहीण) असते, पण क्वचितप्रसंगी काही नातेसंबंध नसलेल्या डोनर्सकडून मिळालेले सेल (कोशिका), किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या कोशिकांचे तसेच नाभिरज्जूंचे परीक्षण करून त्यांचा वापर केला जातो.
स्टेमसेल प्रत्यारोपणाचा वापर 65 वर्षे वयाच्या लोकांवर फार कमी प्रमाणात करतात कारण ह्याच्या यशस्वी होण्याची फारच कमी शक्यता असून ह्याचे अन्य परिणाम प्राणघातक आहेत. रीलॅप्स झाल्यानंतर, जे लोक स्टेम सेल प्रत्यारोपण करवून घेऊ शकत/सहन करू शकत नाहीत, अशा लोकांवर केला जाणारा उपचार बहुतेक निम्न दर्जाचा आणि प्रभावी नसतो, ज्य्ामुळे रोग्यास आणखीनच आजारी असल्यासारखे वाटत राहते. तथापि, हा आजार पुन्हा परत येऊ शकतो. ज्या लोकांवर कोणत्याही औषधोपचाराचा प्रभाव होत नसेल त्यांना अखेरच्या काळात निरोपाची वागणूक (पॅलॅटियर केअर होम) दिली जाणे योग्य आहे.
– डॉ. राजेन्द्र माने