Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कोणत्या पदार्थातून मिळू शकतं मॅग्नेशिअमची खनिज, जाणून घेऊ या

by प्रभात वृत्तसेवा
January 17, 2021
in आहार
A A
कोणत्या पदार्थातून मिळू शकतं मॅग्नेशिअमची खनिज, जाणून घेऊ या
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram
  • डॉ. मेधा क्षीरसागर

आपल्या शरीराचा विविध आजारापासून बचाव करण्यासाठी मॅग्नेशिअम या खनिजाची आवश्‍यकता असते. म्हणूनच शरीराच्या जडणघडणीत मॅग्नेशिअमचं महत्त्व अधिक आहे. ते कोणत्या पदार्थातून मिळू शकतं, हे जाणून घेऊ या.

आपण नेहमी म्हणतो की, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषणमूल्यांची आवश्‍यकता असते. त्यातही शरीराला भरपूर प्रमाणात मिनरल्स अर्थात खनिजांची आवश्‍यकता असते. या खनिजांपैकी मॅग्नेशिअम हे महत्त्वाचं खनिज होय. हे आपल्या शरीराला का महत्त्वाचं आहे तसंच ते आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळेल हे पाहू या.

काही पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात नियमित समावेश केल्यास तुम्हाला आपोआप मॅग्नेशिअम मिळू शकतं. केवळ मॅग्नेशिअम मिळवण्यासाठी वेगळं काही वेगळं औषध घ्यायची गरज लागत नाही.

दही
यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत असतो.

केळं
यात पोटॅशिअमच्या सोबत मॅग्नेशिअमचादेखील भरपूर स्रोत असतो. आपली पाचक शक्ती मजबूत करण्याचं काम केळं करतं. याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्याचं कामही ते करतं.

सीताफळाच्या बिया
या बियांमध्ये मॅग्नेशियमचा भरपूर स्रोत असतो. या बिया उन्हात वाळवून त्याला तेल आणि मीठ लावून भाजून घ्या आणि त्या नियमित सेवन करा. शरिराला आवश्‍यक असणारं मॅग्नेशिअम तुम्हाला यातून मिळेल.

बदाम
मॅग्नेशियमचा सगळ्यात उत्तम स्रोत म्हणजे बदामच म्हणावं लागेल. पाण्यात भिजवलेले पाच बदाम दररोज खाल्ल्‌याने स्मरणशक्ती वाढते. त्याचप्रमाणे चेतासंस्था सुधारते, जेणेकरून चेतासंस्थेचे संबंधित आजारापासून बचाव होतो.

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये लोह असतं हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचबरोबर मॅग्नेशिअमदेखील भरपूर प्रमाणात मिळतं. शरीराला आवश्‍यक असणाऱ्या हिमोग्लोबिनमध्ये वाढ करण्याचं काम करतं. त्याचबरोबर स्नायूंनादेखील मजबूत करण्यात मदत करतं.

कडधान्य
न्याहज्ञरीत मोड आलेले मूग आणि चणे खाल्ले तर शरीराचा मेटाबोलिजम सुधारतो.

फायदे काय आहेत?
कॅल्शिअमप्रमाणेच मॅग्नेशियम एक क्षार आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार असं सिद्ध झालं आहे की, शरीरात असलेल्या एन्झाइमबरोबर मिसळून ग्लुकोज तयार करण्याचं काम ते करतं. इन्सुलिन करण्याच्या प्रक्रियेतही करतं. मॅग्नेशिअमचा स्रोत असलेल्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे टाईप-2 डायबिटीजचा धोका कमी होतो, जेणेकरून स्मरणशक्ती मजबूत होते. त्याचप्रमाणे उच्च रक्‍तदाब, हृदयविकार, ताण, माइग्रेन व आर्थ्रायटिससारख्या समस्यांपासूनही बचाव होतो. कॅल्शिअमसोबत राहिल्याने हाडांची मजबुतीही होते. गरोदर स्त्रियांसाठी हे आवश्‍यक आहे, कारण यामुळे बाळाची वाढ उत्तम होते.

अतिरेक नकोच
मॅग्नेशियम अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास नुकसानच होईल. कारण याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे कमी रक्तदाब, डायरियासारखे आजार होऊ शकतात. मात्र नैसर्गिक प्रमाणात जितकं सेवन कराल तितकं अधिक चांगलं असतं. मात्र त्याचा अतिरेक अजिबात करू नका.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar