Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Lempuyang Temple : बालीच्या स्वर्गद्वारातलं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर ‘लेम्पुयांग मंदिर’ तुमच्या यादीत असायलाच हवं !

by
July 26, 2025
in लाईफस्टाईल
A A
Lempuyang Temple : बालीच्या स्वर्गद्वारातलं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर ‘लेम्पुयांग मंदिर’ तुमच्या यादीत असायलाच हवं !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Bali । Lempuyang Temple । Gate of Heaven – बाली बेटावरील पूर्वेकडील करंगसेम जिल्ह्यात अबांग गावाजवळ वसलेले ‘लेम्पुयांग मंदिर’ हे एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर मानले जाते. बालीतील सहा प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक भेट देतात.

हे मंदिर “सद कह्यांगानं जगत” म्हणजेच बालीतील सहा पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे,जे संपूर्ण बेटाचे अध्यात्मिक रक्षण करतात.
येयेथे ईश्वर या देवतेची पूजा केली जाते, जे बाली हिंदू धर्मात पूर्व दिशा दर्शवतात. हे मंदिर ११ व्या शतकात उभारले गेले असल्याचे मानले जाते.

काय खास आहे?

लेम्पुयांग मंदिर हे बालीमधील सर्वात पवित्र आणि जुने मंदिरांपैकी एक मानलं जातं. ‘गेट वे टू हेवन’ म्हणजेच स्वर्गद्वार म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर त्याच्या आकर्षक दगडी कमानीसाठी प्रसिद्ध आहे. येथे उभं राहून समोर माउंट अगुंग पर्वताच्या पार्श्वभूमीवर फोटो काढणे ही अनेक प्रवाशांची स्वप्नपूर्ती असते!

मंदिर परिसरात एकूण १७०० पायऱ्या आहेत, आणि वर जाताना निसर्गसौंदर्याचं जबरदस्त दर्शन होतं. येथे फोटोग्राफीसाठी ‘मिरर इफेक्ट’ देणारे स्थानिक लोक भेटतात. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात!

वेळ आणि तिकीट :

मंदिर उघडण्याची वेळ: दररोज सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

प्रवेश फी: मंदिरात प्रवेशासाठी अधिकृत शुल्क नसले तरी देणगी देण्याची प्रथा आहे

फोटोसाठी चार्जेस: ‘गेटवे टू हेवन’ फोटोसाठी स्थानिक लोकांकडून अंदाजे ३०,००० – ५०,००० इंडोनेशियन रुपिया आकारले जातात (₹१५० – ₹३०० पर्यंत)

सर्वात चांगला वेळ: सकाळी लवकर जा! गर्दी टाळता येते आणि सूर्यप्रकाशामुळे फोटोसुद्धा सुरेख येतात.

कसे पोहोचायचे?

लेम्पुयांग मंदिर हे बालीच्या करंगसेम जिल्ह्यात, डेनपसारपासून सुमारे ८०–९० किमी अंतरावर आहे. तेथे पोहोचण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट कार किंवा स्कूटर भाड्याने घेऊ शकता (ड्रायव्हरसह टूर बुकिंग केल्यास अधिक सोयीचं) डेनपसारहून २.५ ते ३ तासांचा प्रवास आहे. गुगल मॅपवर ‘Lempuyang Temple’ किंवा ‘Pura Lempuyang Luhur’ असे सर्च केल्यास लगेच सापडते.

जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा:

– मंदिर पवित्र स्थळ आहे, सारंग (कमरपट्टा व स्कार्फ) घालणे बंधनकारक आहे. हे तिथे भाड्याने मिळतात.

– पायऱ्या चढण्याची तयारी ठेवा, चपला, पाणी आणि टोपी सोबत ठेवा.

– ड्रोन्स वापरण्यावर निर्बंध असू शकतात.

– मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक नियमांचे पालन करणं आवश्यक आहे.

मंदिराजवळील खास आकर्षण :

Tirta Ganga _सुंदर जलप्रासाद
Mount Agung _बळीचा सगळ्यात उंच पर्वत
Goa Lawah _बॅट केव्ह मंदिर
Virgin beach _स्वच्छ ,शांत समुद्रकिनारा

लेम्पुयांग मंदिर म्हणजे अध्यात्म, निसर्गसौंदर्य आणि फोटोजेनिक अनुभव यांचा परिपूर्ण संगम. बालीला भेट दिल्यावर इथे न जाणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव गमावणं!

Join our WhatsApp Channel

The post Lempuyang Temple : बालीच्या स्वर्गद्वारातलं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर ‘लेम्पुयांग मंदिर’ तुमच्या यादीत असायलाच हवं ! appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar