मुंबई – बदलत्या काळानुसार ज्या प्रमाणे मोबाईलचे रंगरूप बदलत गेले, अगदी त्याच प्रमाणे मोबाईल सोबत मिळणाऱ्या ऍक्सेसरीजने देखील वेळोवेळी कात टाकत स्वतःला अपडेटेड ठेवले आहे. स्मार्टफोन म्हटलं की त्याच्यासोबत एका ऍक्सेसरीचं नाव प्रामुख्यानं जोडलं जातं, इअरफोन, चार्जर यांचा समावेश होतो, यात आता आणखी एका ऍक्सेसरीचा समावेश झाला आहे ती ऍक्सेसरी म्हणजे ‘स्मार्ट रिंग’. ही रिंग ( smart ring uses ) बोटात घातल्यावर तुम्ही आयफोन किंवा इतर फोन तुम्ही हात न लावता ऑपरेट करु शकता.
अॅपलने एक स्मार्ट रिंग लाँच केली आहे. कंपनीने या रिंग साठी पेटेंट फाईल केलं आहे. या रिंग ( smart ring uses मध्ये टचस्क्रीन, व्हॉईस कमांड आणि हँड जेस्चर कंट्रोलसारखे फीचर दिले आहेत. ज्या प्रमाणे सध्या मोबाईलचा स्मार्टफोन पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे अगदी त्याचप्रमाणे वायर्ड हेडफोन्सपासून ते वायरलेस इयरबड्स पर्यंतचा इअरफोनचा प्रवास देखील रोमांचक आहे.
पेटेंटमध्ये ड्रॉईंग ऑफ पोटेन्शल डिझाईन, रिचार्जेबल पॉवर सोर्स आणि व्हायरलेस ट्रान्स-रिसीवरसारख्या फीचर्सचा समावेश केला आहे. रिंग कोणत्याही बोटात घालू शकता. या रिंग ( smart ring uses च्या मदतीने युजर्स आयफोन आणि आयपॅडचा वापर चांगला करता येणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
दरम्यान, फोन कुठे विसरला आणि तो शोधायचा असल्यास तुम्ही या रिंग ची मदत घेऊ शकता. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनचे अचूक ठिकाण शोधू शकता.