काजू कतली म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना ! दुधाच्या खिरीमध्ये, गोड शिऱ्यामध्ये, बिर्याणी मध्ये, भाजीच्या ग्रेवीमध्ये काजू आवर्जून टाकले जातात. काजू खाल्ल्याने शरीराला उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘बी’ सुध्दा असतात.
1.काजूमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं. ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी काजू फायदेशीर ठरतात.
2.मासिक पाळीत मूडस्विंग टाळण्यासाठी काजू उत्तम उपाय आहे. काजूमध्ये आयर्न आणि ओमेगा-3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात मदत करते.
3.काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
4.काजूमध्ये असलेले अँटीऑक्सिीडंट्स मुळे डोळ्याच आरोग्य चांगली ठेवण्यास मदत करते.
5.काजू खाल्ल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते. त्यांनी काजू आवर्जून खायला द्यावेत.
6.अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास दररोज काजू खावेत.
7.काजूच्या तेलाने त्वचा टवटवीत होते. ह्या तेलात सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम प्रमाण मुबलक असतं. काजू खाल्याने व तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात व सिल्की टेक्सचर येतं.
8.काजू शरीराचा बीएमआय इंडेक्स नियंत्रणात ठेवते.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.