Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जाणून घ्या कशा तयार होतात कर्कपेशी?

by प्रभात वृत्तसेवा
January 1, 2021
in आरोग्य वार्ता
A A
जाणून घ्या कशा तयार होतात कर्कपेशी?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – अधिक बाळंतपणे अशा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग (Cancer cells) जास्त प्रमाणात आढळतो असे दिसते. वारंवार बाळंतपणे होऊन झालेल्या जखमांबरोबरच अस्वच्छता हे ही एक कारण यासाठी जबाबदार धरण्यात येते. पॅपिलोमा विषाणूंशी याचा संबंध आता निश्‍चित झाला आहे. 

भारतामध्ये तंबाखू-चुन्याची गोळी तोंडात ठेवण्याची पद्धत खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या विशिष्ट जागी कर्करोगाची बाधा होण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणावर असते, असे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. तिखट पदार्थ खाण्याचे जास्त प्रमाण असलेल्या भागात जठराच्या कर्करोगाचे (Cancer cells) प्रमाण जास्त आहे असे दिसते, पण याबद्दल अजून निश्‍चिती होणे आवश्‍यक आहे.

कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची कारणे पुरेशी कळलेली नाहीत. साध्या पेशींमधून कर्कपेशी तयार होतात. पेशीकेंद्राच्या गुणसूत्रबदलांमुळे असे होते हे नक्की. आता हे बदल का घडतात याबद्दल काही थोडी माहिती कळली आहे. 

निसर्गत: आपल्या शरीरात नेहमीच थोडया कर्कपेशी सतत तयार होत असतात. त्यातील बऱ्याच कर्कपेशी आपोआप
नष्ट होतात. मात्र, काही शिल्लक राहतात. काही रासायनिक पदार्थांशी संबंध येणे : उदा. रंगात वापरले जाणारे काही रासायनिक पदार्थ, डांबरापासून बनवलेली काही रसायने, काजळी (उदा. कारखान्यांच्या धुराड्यांची काजळी), ऍसबेस्टॉस (ज्याचे पत्रे बनवले जातात), पेट्रोलियम ज्वलनानंतर तयार झालेले वायू, सिगारेट-विडीमधील निकोटिन, इत्यादी.

किरणोत्सर्गी पदार्थ : म्हणजे अणुविभाजनानंतर तयार होणारे ऊर्जाभारित किरण. यामुळे पेशीकेंद्रात निश्‍चित बदल होतो. अणुभट्ट्या व अणुविभाजन प्रक्रिया वापरणाऱ्या अनेक कारखान्यांच्या आजूबाजूच्या लोकांना व कामगारांना विशिष्ट प्रकारचे कर्करोग जास्त प्रमाणात होतात हे दिसून आलेले आहे.जपानमध्ये अणुबॉंब टाकल्यानंतर लक्षावधी लोकांना व त्यांच्या पुढच्या पिढ्यांना अनेक प्रकारचे कर्करोग (Cancer cells) झाले हे याचे सर्वात मोठे व भयानक उदाहरण आहे. अणुभट्टीची राख ही किरणोत्सर्गी म्हणून कर्करोगाला कारण ठरते.

एखाद्या जागी सतत घर्षण : त्वचेवर एखाद्या ठिकाणी सतत घर्षण किंवा अन्य त्रास (उदा. उष्णता) होत असल्यास काही जणांना त्या ठिकाणी कर्करोग होतो असे आढळले आहे. उदा. काहीजणांना कमरेवरच्या धोतराच्या रेघेवर कर्करोग (Cancer cells) झाल्याचे आढळून आले आहे, पण हे केवळ त्वचेपुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे अशा प्रकारे घर्षण टाळणे, हाही एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

व्यसने : दारू व तंबाखू यांचा कर्करोगाशी संबंध आहे. दारूमुळे यकृताचा कर्करोग (Cancer cells) होण्याची शक्‍यता असते. याहीपेक्षा धूम्रपान आणि फुप्फुसाचा कर्करोग यांतला संबंध अधिक पक्का आहे. या दृष्टीने धूम्रपान हे अधिक घातक व्यसन आहे, असे म्हणता येईल. गुटखा खाण्यामुळे तोंडाचा कर्करोग (Cancer cells)आढळतो. अनेक विषाणूंचा कर्करोगाशी संबंध
सिद्ध होत आहे. (उदा. गर्भाशय कर्करोग)

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar